हर्षवर्धन पाटील हे तर आउटडेटेड झालेले नेते! 

विरोधक मनाने हरले असल्याने लढाईत त्यांचा निभाव लागणार नाही.
हर्षवर्धन पाटील हे तर आउटडेटेड झालेले नेते! 

पिंपरी (पुणे) : काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आता आउटडेटेड झाले असल्याने त्यांना पक्षात घेऊ नका, या कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार केला जाईल, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी सांगत पाटलांना भाजपमध्ये नो एंट्री असल्याचे संकेत सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दिले. 

पक्षाच्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठकीत हाळवणकर बोलत होते. पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु आहे. त्याबाबत कार्यकर्त्यांचा कानोसा हाळवणकरांनी घेतला. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात 1 ऑगस्टपासून निघणाऱ्या जनआर्शिवाद यात्रेची मदत घेतली. इंदापूर मतदारसंघात या यात्रेला तीन हजार कार्यकर्ते आल्यास काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करायला विलंब करायला नको असे वाटले पाहिजे, असे ते म्हणाले. त्यावर इंदापूरचे कार्यकर्ते शांत दिसताच चिंता करु नका, तुमच्या भावनेचा विचार केला जाईल, असे त्यांना सांगावे लागले. एवढेच नाही, तर आता पक्षात प्रवेश बंद झाले असल्याचेही ते म्हणाले. विरोधक मनाने हरले असल्याने लढाईत त्यांचा निभाव लागणार नाही. निवडून येऊ अशी त्यांची मानसिकताच राहिलेली नाही, असा हल्लाबोल त्यांनी दोन्ही कॉंग्रेसवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com