Video Police Recruitment : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खुषखबर! बीडमध्ये होणार 171 जागांसाठी भरती

Beed Police Recruitment : पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
Maharashtra Police
Maharashtra Police RecruitmentSarkarnama

Beed Police : बीड जिल्ह्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आता खुशखबर आहे. बीड जिल्ह्यात तब्बल 171 जागांसाठी पोलिस भरती होणार आहे. याबाबत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

महाराष्ट्रात 19 जून ते 28 जून अशी एकूण 10 दिवस पोलिस भरती प्रक्रिया चालणार आहे. सर्व भरती प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार आहे. तर महाआयटी पोर्टलच्या माध्यमातून पोलिस भरतीची उमेदवारांना माहिती उपलब्ध केली जाणार. विशेष म्हणजे निकाल तात्काळ जाग्यावराच सांगितले जाणार आहेत.

यात बीड जिल्ह्यासाठी एकूण 171 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यामुळे आता पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी दिलासा मिळला आहे. या प्रक्रियेत बीडमधील युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, आदी मुद्दे चांगलेच गाजले होते. याचा फटका बीडमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बसला आहे. आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. तत्पुर्वीच राज्यभरात पोलिस भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Maharashtra Police
Video Ravi Rana Vs Bacchu Kadu : बच्चू कडू 'ब्लॅकमेलर' नंबर वन; पत्नीच्या पराभवानं 'घायाळ' रवी राणांनी सगळंच काढलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com