IPS Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या शुक्ला होणार पोलिस महासंचालक ?

Director General of Police News : राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती एमपीएससीच्या संचालकपदी करण्यात आली आहे.
Rashmi Shukla News
Rashmi Shukla NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना आता राज्य सरकार मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे. राज्याचे पोलिस (Police) महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती एमपीएससीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. त्यामुळे सेठ यांच्या जागी शुक्ला यांना बढती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर शुक्ला यांच्याकडे पोलिस दलाची सूत्रे देण्याचा राज्य सरकारचा प्लॅन असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन FIR रद्द केले आहेत. एक FIR पुण्यात तर दुसरा मुंबईत दाखल करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभगाच्या प्रमुख या नात्याने विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप शुक्ला यांच्यावर करण्यात आला होता. फडणवीस सरकारनंतर जेव्हा राज्यात आघाडीचे सरकार आले, त्यावेळी शुक्लांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Rashmi Shukla News
Shivsmarak News : सात वर्षांपूर्वी खुद्द पंतप्रधान मोदींनीच भूमिपूजन केले; पण शिवस्मारकाची एकही वीट चढली नाही

शुक्ला यांनी पुण्याचे (Pune) पोलिस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक), महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), डीआयजी (प्रशासन), नागपूरच्या एसपी आणि सोलापूरचे डीसीपी म्हणून काम पाहिले आहे. मात्र, राज्य गुप्तचर विभाग (SID)आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. त्यातून त्यांना दिलासा मिळाल्यानंतर त्या पुन्हा महाराष्ट्रात महत्त्वाच्या पदावर येणार असल्याची चर्चा आहे. शुक्ला या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या जवळच्या अधिकारी मानल्या जातात.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे शुक्लांना पोलिस दलाच्या प्रमुख करून आघाडीच्या नेत्यांवर वचक निर्माण करण्याची खेळी भाजप (BJP) करू शकते. मात्र, त्यांच्यावर झालेले आरोप अडचणीचे ठरू शकतात. त्यांच्यावर आणि राज्य सरकारवर विरोधक टीकेची झोड उठवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रश्मी शुक्ला 1988 बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या सशस्त्र सीमा बलाच्या डीजीपी आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Rashmi Shukla News
Dada Vs Saheb : साहेबांच्या दोन दौऱ्यांची धास्ती, अजितदादांची अस्वस्थ राष्ट्रवादी...!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com