Pune News : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्यातील पोलिस दलात खांदेपालट करण्यात आली आहे. निवडणुका डोळयांसमोर ठेवून उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे अधिकृत आदेश गृह विभागाकडून मंगळवारी काढण्यात आले.
राज्य पोलिस सेवेतील पोलिस उपायुक्त तथा पोलिस अधीक्षक दर्जाच्या (Police Officer) 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पोलिस मुख्यालय आणि शहर वाहतूक शाखेचा अतिरिक्त कार्यभार होता.
त्यासोबतच सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांची पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक याठिकाणी बदली करण्यात आली. तर, गडचिरोली येथील राज्य राखीव पोलिस बलाचे समादेशक विवेक मासाळ यांची पुण्यात पोलिस उपायुक्तपदी बदली करण्यात आली.
राज्यातील अन्य पोलिस उपायुक्त,पोलिस अधीक्षकाचे नाव, विद्यमान आणि कंसात त्यांच्या बदलीचे ठिकाण- संदीप पालवे, पोलिस अधीक्षक- एटीएस, छत्रपती संभाजीनगर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड), संदीप भाजीभाकरे, पोलिस उपायुक्त-लोहमार्ग, मुंबई (राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर), सचिन गुंजाळ, पोलिस उपायुक्त ठाणे शहर (एटीएस, छत्रपती संभाजीनगर), दत्ताराम राठोड, पोलिस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, अमरावती (अतिरिक्त अधीक्षक, लोहमार्ग नागपूर), विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त नवी मुंबई (मुंबई), रश्मी नांदेडकर, पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग (नवी मुंबई), प्रदीप चव्हाण, मुख्य सुरक्षा अधिकारी- सचिवालय मुंबई (पोलिस उपायुक्त मुंबई), मीना मकवाना, पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर (ठाणे शहर).
दत्ता नलावडे, पोलिस उपायुक्त मुंबई (लोहमार्ग, मुंबई), राजू भुजबळ, पोलिस उपायुक्त मुंबई (मुख्य सुरक्षा अधिकारी, सचिवालय, मुंबई), रूपाली दरेकर, पोलिस अधीक्षक - नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर (महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर), अनिता जमादार, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर (नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर), लता फड, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक पुणे (पोलिस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर) याप्रमाणे बदल्या करण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.