Silver Oak Attack
Silver Oak Attack Sarkarnama

Silver Oak Attack : मुंबई पोलिसांनी पुण्यातून पत्रकाराला केली अटक; घराची रेकी केल्याचा संशय

हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पुण्यातून एका पत्रकाराला अटक केली आहे. या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातूनही ही अटक झाल्याचे बोलले जात आहे. (Silver Oak Attack)

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांची कोठडी आज संपत असून त्यांना न्यायालयात सादर केले जाणार आहे. सदावर्ते यांच्यासह 115 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. 109 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आता पुणे कनेक्शन समोर आले आहे. पुण्यातून एका पत्रकाराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Silver Oak Attack
संतोष पाटील यांची सुसाईट नोट सापडली; ग्रामविकास मंत्र्यांवर गुन्हा दाखल

'एएनआय'ने याबाबत वृत्त दिले आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणी पुण्यातील पत्रकाराला अटक केल्याचे त्यात म्हटले आहे. पोलिसांनी या पत्रकाराला चौकशीनंतर मुंबईला नेले आहे. मुंबई येथील गावदेवी पोलिसांनी ही अटक केली आहे. चंद्रकांत सुर्यवंशी (Chandrakant suryawanshi) असं या पत्रकाराचे नाव आहे. तो भारती विद्यापिठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आंबेगाव पठार या ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस उपायुक्त निलोप्तल यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुर्यवंशीचे MJT नावाचे यू ट्यूब चॅनल आहे. शरद पवरांच्या सिल्वर ओक या निवासस्थाची रेकी केल्याचा सूर्यवंशीवर संशय आहे.

दरम्यान, या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील एकाचे नाव सच्चिदानंद पुरी असे आहे. सच्चिदानंद पुरी हा सदावर्ते यांच्या जवळचा व्यक्ती आहे. तोच एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना सदावर्ते यांचा निरोप पोचवायचा. पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या कटात पुरी या सहभाग असल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.

एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी ८ एप्रिलला पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला होता. त्याच रात्री गावदेवी पोलिसांकडून सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ९ एप्रिलला न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ती संपल्यानंतर काल पुन्हा न्यायालयात उभे केल्यानंतर १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली. दरम्यान, सिल्व्हर ओक परिसरातून ताब्यात घेण्यात आलेल्या ११० आंदोलक कर्मचाऱ्यांचाही जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com