Aba Landge Died : माजी जिल्हा परिषद सदस्य आबा लांडगे यांचे निधन

Pune Shivsena : सच्चा कार्यकर्ता हरपल्याची शिवसैनिकांची भावना
Somnath Landge
Somnath LandgeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : पुणे जिल्ह्यातील शिवसनेनेचे आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले सोमनाध उर्फ आबा लांडगे यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी सोमवारी (ता. २९ मे) अखेरचा श्वास घेतला.

आबा लांडगे शेवटपर्यंत ठाकरे गटाचे (Shivsena UBT) कट्टर समर्थक राहिले. ते खेड-शिवापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य काम शिवगंगा खोऱ्याचा विकास करण्यावर भर दिला. अनेक प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी परिश्रम घेतले. आबा यांनी शिवसेनेचे हवेली (Haweli) तालुका प्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली. त्यांनी खडकवासला मतदासंघातून विधानसभाही लढविली होती. Aba Landge Died

Somnath Landge
Cabinet Decision: शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य मंत्रिमंडळाचे 12 मोठे निर्णय

दरम्यान, अल्पशा आजारामुळे त्यांच्यावर पुण्यातील (Pune) खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर श्रीरामनगर (बांडेवाडी) खेड शिवापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक बांधिलकी असणारा सच्चा कार्यकर्ता हरपल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com