लाॅकडाऊनच्या काळात अजित पवारांचा मोबाईल ठरतोय लई 'हिट'!

कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोबाईल नंबर जाहीर केला आहे. लोक अडचणीच्या काळात या क्रमांकावर फोन करुन आपल्या अडचणी सोडवून घेत आहेत
Mobile Number given by Ajit Pawar Viral
Mobile Number given by Ajit Pawar Viral

पुणे : ''दादा,त्यांचा नंबर माझ्याकडे नाही.तुमचा होता," असे बुलढाणा येथील शेतकऱ्यांने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात काहीही अडचण आली तर लोकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच आठवण येत आहे. पवार यांनी जाहीर केलेल्या मोबाईलवर लोक फोन करत आहेत. त्यांना आपल्या अडचणी सांगत आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने पोलिसांनी अडवले म्हणून थेट अजित पवारांकडे गाऱ्हाणे मांडले. तेव्हा अजितदादांनी ' बुलढाणा जिल्ह्यातील आमदार खासदार कोठे गेले? डॉ शिंगणे कोठे गेले?' असे म्हणताच तो शेतकरी म्हणाला "दादा,त्यांचा नंबर माझ्याकडे नाही.तुमचा आहे."

चार दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दोघांनी पवारांना पेट्रोल पंपवाले शेतकऱ्यांना डिझेल देत नाहीत म्हणून फोन केल्याचे ऑडिओ व्हायरल झाले. आता बुलढाणा जिल्ह्यातील चांदोल येथून एका शेतकऱ्यांने'पोलीस मला शेतात जाऊन देत नाहीत. तहसीलदारांचे पत्र मागत आहेत.'असा फोन केला. अजितदादांना फोन केला की फोन उचलला जातो आणि प्रश्न मार्गी लागतो अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक त्यांना फोन करत आहेत. अडचणी सांगत आहेत.

चांडोल येथील एका शेतकऱ्याचे शेत जालना आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. तो शेतात जाताना पोलिसांनी त्याला अडवले. तहसीलदारांचे पत्र मागितले.मग त्याने अजितदादांना फोन केला.त्यावेळी अजितदादांनी त्याला तुम्ही तहसीलदारांना भेटा.आणि मी सांगितलं आहे म्हणून त्यांना सांगा.' असे सांगितले. "तुमच्या जिल्ह्यातील आमदार खासदार कोठे गेले? का गेले सगळं सोडून? डॉ शिंगणे कोठे आहेत?'', अशी विचारणा अजितदादांनी केली. तेव्हा तो शेतकरी म्हणाला,"दादा,त्यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही. तुमचा होता."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com