Ambegaon Water Crisis : आंबेगावचा पाणीप्रश्न एका वर्षात सोडविणार आमदार संजय जगताप यांची ग्वाही

‘‘आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एका वर्षात सोडविणार असून, यासाठी खडकवासला आणि भामा आसखेड धरणामधून भूसंपादनासह ३९० कोटींची योजना महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक कमिटीच्या मान्यतेला सादर आहे.
Sanjay Jagtap
Sanjay JagtapSarkarnama
Published on
Updated on

पुणे : ‘‘आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एका वर्षात सोडविणार असून, यासाठी खडकवासला आणि भामा आसखेड धरणामधून भूसंपादनासह ३९० कोटींची योजना महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक कमिटीच्या मान्यतेला सादर आहे. त्यामुळे या परिसराचा पुढील ३० वर्षांचा पाणीप्रश्न सुटणार आहे,’’ अशी ग्वाही महाविकास आघाडीतील पुरंदर- हवेली मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संजय जगताप यांनी दिली.

आंबेगाव बुद्रुक (ता. हवेली) परिसरात रविवारी (ता. १०) संजय जगताप यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पदयात्रा, कोपरा बैठकीतून झंझावाती प्रचारदौरा केला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून युवक, नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करीत प्रोत्साहन दिले.

येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव पठार, जांभूळवाडी, कोळेवाडी परिसरात दौरा केला. अनेक संस्था, संघटनांनी जगताप यांना पाठिंबा जाहीर केला.

उद्धव दांगट, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष अनिल दळवी, उपसरपंच गणेश कोंढरे, तानाजी दांगट, नीलेश कोंढरे, अनिल कोंढरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संपूर्ण आंबेगावातील मतदार जगतापांच्याच पाठीशी राहील, असा विश्वास गणेश कोंढरे यांनी दिला.

आमदार संजय जगताप यांनी कोरोनाकाळासह त्यानंतरही केलेल्या विकासकामांचे पदयात्रेदरम्यान नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. त्यामुळे आमदार जगताप यांचा आत्मविश्वास आणखी वाढला असून आंबेगाव परीसरातील वाहतूक कोंडीबाबत एकात्मिक वाहतूक आराखड्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करीत असल्याचे सांगत सुनियोजित विकासासाठी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन गणेश कोंढरे यांनी केले.

पाच वर्षांत निष्ठावंत आमदार संजय जगताप यांनी आंबेगाव परिसराच्या विकासासाठी मोठा हातभार लावला. पाण्याचा प्रश्न, जीवघेण्या वाहतूक समस्येवर तोडगा काढून परिसर स्मार्ट बनवला. आमदार फंडातून विविध भागात विकासात्मक कामे केली. सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. जनहितासाठी अनेक विकासकामे केली. त्यामुळे आंबेगाव परिसरातून त्यांना मताधिक्य मिळणार आहे.

- सुधीर कोंढरे, अध्यक्ष, जनहित विकास मंच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com