पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वादात अखेर पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी शुक्रवारी (ता. ६) बाजी मारली.
झुरंगे हे शुक्रवारी स्थायी समितीवर बिनविरोध निवडून आले. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पुरंदरचे आमदार संजय जगताप ठाण मांडून होते. झुरंगे यांच्या निवडीमुळे तब्बल १ वर्षभरापासून रिक्त असलेली स्थायी समितीची जागा भरली गेली आहे.
दरम्यान, माजी सहकारमंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता यांनी फक्त स्थायीच नव्हे तर, अन्य कोणत्याही समितीच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्जसुध्दा दाखल केला नाही. त्यांचा हा अघोषित बहिष्कार असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, स्थायी समितीवर सदस्य होण्यासाठी झुरंगे यांनी कृषी समितीवरील सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्याही समितीच्या सदस्यत्वाच्या नियुक्तीसाठी आज निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या समितीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने, ही जागा रिक्त राहिली आहे. सध्या अंकिता पाटील या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही समितीवर.सदस्य नसलेल्या एकमेव जिल्हा परिषद सदस्य आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.