मोठ्या लोकांनी मला फसविले : मंत्री दत्तात्रेय भरणे

...
datta bharane
datta bharane

इंदापूर : तालुक्यातील मोठ्या लोकांनी मला फसवले, मात्र माजी नाळ सर्वसामान्य जनतेशी असल्याने त्यांनी मला तारले. त्यामुळे मी एकटा मंत्री नसून आपण सर्वजण मंत्री आहात. त्यामुळे आपण शेवटपर्यंत गरिबांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे  असे प्रतिपादन जलसंधारण व बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर शहर सकल हराळे वैष्णव समाज तसेच श्री संत रोहिदास मित्र मंडळाच्या श्री संतशिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव 2020 चासमारोप मंत्री श्री भरणे यांच्या हस्ते झाला. समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांच्या हस्ते राज्यमंत्री भरणे तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी संलग्न नूतन जिल्हा, तालुका कार्यकारिणीचा सत्कार झाला.

मंत्री भरणे पुढे म्हणाले, ``आपण सर्व घरची माणसे असून अगोदर काम करून नंतर सांगायचा आपला स्वभाव आहे. त्यामुळे तुम्ही निधीचा कुठलीही तांत्रिक अडचण येऊ न देता वापर करणे गरजेचे आहे. रोहिदास महाराज यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घेऊनआपण सर्वांनी सुखी आयुष्य जगणे गरजेचे आहे.

विठ्ठल ननवरे म्हणाले, रोहिदास समाज मंदिरासाठी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या 25 लाख रुपयापैकी 15 लाख रुपयातून हे काम झाले आहे तर 10 लाख रुपये तांत्रिक अडचणीमुळे अडकले आहेत. आता सभामंडपासाठी निधी हवा आहे.

सूत्रसंचलन हरिदास सामसे यांनी केले. यावेळी हरिदास हराळे, सुनील कांबळे, सुरेश सोनवणे, सचिन सोनवणे, अमोल उन्हाळे, धनंजय कांबळे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com