वाडेबोल्हाई गण भाजपकडून सर;  प्रदीप कंदांना विधानसभेच्या आधी धक्का! 

वाडेबोल्हाई गण भाजपकडून सर;  प्रदीप कंदांना विधानसभेच्या आधी धक्का! 

केसनंद : वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाइं मित्रपक्षांचे उमेदवार श्‍यामराव परिलाल गावडे यांनी 6945 मते मिळवत 1206 मतांनी विजय संपादन केला. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बळिराम गावडे यांना 5739 मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार भरत गडदे यांना 1564 मते मिळाली. राजेंद्र पठारे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. 188 जणांनी नोटाचा वापर केला. 

कंद गटाला धक्का 
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेली ही पंचायत समितीची पोटनिवडणूक अत्यंत चुरशीने लढली गेली. भाजप-शिवसेना पुरस्कृत आघाडीने राष्ट्रवादीच्या ताब्यातील या गटात प्रवेश करण्यासाठी फारसा गाजावाजा न करता नियोजनबद्धपणे प्रचार यंत्रणा राबविली. तर विक्रमी विकासकामे केलेला पेरणे वाडेबोलाई गटातील हा हक्काचा गण असल्याने जोरदार शक्तिप्रदर्शन व प्रचार करूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसला येथे अपयश आले. यामुळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद तसेच पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप यांना धक्का बसला आहे. 

राजीनामा देणार : जगताप 
पक्षीय राजकारणातील कुरघोडीला कंटाळून तसेच झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पत्नी कल्पना जगताप या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा तर मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य पदाचाही राजीनामा देऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया सुभाष जगताप यांनी दिली. 

``श्‍यामराव गावडे यांनी हवेली तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तसेच भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले आहे. सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना तळागाळात पोचविल्या आहेत. त्यांना मिळालेले यश केलेल्या कामाची पावती आहे,``असे आमदार  बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.

जनतेने दिलेला कौल मान्य आहे. मात्र विकासकामांचा अक्षरशः डोंगर उभारूनही जनतेने असा निर्णय का घेतला, हे अनाकलनीय आहे, अशी प्रतिक्रिया प्रदीप कंद यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com