शिरूर हवेलीच्या मतदारयादीत बोगस मतदारांचा समावेश

शिरुर- हवेली विधाऩसभा मतदार संघाच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीत पुर्व हवेलीतील विशेषत: वाघोलीतील सुमारे 3400 नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला. मात्र हा समावेश करताना मतदारांच्या अर्जाची व त्यांच्या कागदपत्राची तपासणी न करताच ती नावे समावेश करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे या मतदारांच्या अर्जाच्या गठ्ठयासोबत हवेली तहसिलदारांच्या पत्राचा परस्पर वापर करण्यात आला आहे.
शिरूर हवेलीच्या मतदारयादीत बोगस मतदारांचा समावेश

वाघोली : शिरुर- हवेली विधाऩसभा मतदार संघाच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीत पुर्व हवेलीतील विशेषत: वाघोलीतील सुमारे 3400 नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला. मात्र हा समावेश करताना मतदारांच्या अर्जाची व त्यांच्या कागदपत्राची तपासणी न करताच ती नावे समावेश करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे या मतदारांच्या अर्जाच्या गठ्ठयासोबत हवेली तहसिलदारांच्या पत्राचा परस्पर वापर करण्यात आला आहे. त्याची नोंद हवेली तहसिलदारांकडे नाही. तसेच या मतदारांच्या अर्जासेाबत जोडलेली अनेक कागदपत्रे बनावट
आहेत.

माजी जिल्हा परीषद अध्यक्ष रामदास दाभाडे यांनी हा प्रकार उजेडात आणला. दरम्यान, या प्रकाराबाबत आमदार बाबुराव पाचर्णे व दाभाडे यानी मुख्य निवडणुक आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.

1 ते 31 जुलै दरम्यान तरुण व पात्र प्रथम मतदारांची नाव नेांदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या यासाठी वाघेालीत सुमारे 20 बीएलओंची नियुक्ती करण्यात आली हेाती. त्यानी नवीन मतदारांचे अर्ज भरुन घेतले. हे अर्ज त्यानी वाघोली तलाठी यांच्याकडे सुपुर्द केले. मात्र प्रारुप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये पुर्व हवेलीतील विशेषत: वाघोलीतील सुमारे 3400 नवीन नावांचा समावेश झाल्याचे दिसुन आले. परंतु, बीएलओ यानी भरुन घेतलेल्या मतदारांचे नाव त्या यादीत आले नाही. जी नावे यादीत समाविष्ट झाली. त्यातील अनेत मतदार ओळखीचे नसल्याने रामदास दाभाडे यानी त्याची सविस्तर माहीती घेतली.

वाघोलीचे तलाठी यानी मतदारांचे अर्ज व त्यासेाबतचे पत्र हवेली तहसिल कार्यालयाकडे न पाठवता तलाठी कार्यालयाच्या एका व्यक्तीकडुन परस्पर शिरुर तहसिल कार्यालयाकडे पाठविले. ते अर्ज तेथील कार्यालयात ठेवुन ती व्यक्ती निघुन गेली. शिरुर तहसिल कार्यालयातील एका महीला कर्मचाऱ्याने त्या पत्रावर, " प्राप्त अर्जामध्ये काही यादी भागावर गुलाबी प्रती जेाडलेल्या नाहीत. अर्ज मंजुर / नामंजुर स्पष्ट उल्लेख केलेला नाही. सदर अर्ज फक्त कार्यालयामध्ये आणुन दिलेले आहेत. अर्ज जमा करुन केाणत्याही प्रकारची पेाहच जमा करणाऱ्यांनी घेतलेली नाही." असा शेरा मारला.

मात्र, यानंतरही त्या अर्जाची तपासणी न करताच त्या सर्व नावांचा समावेश प्रारुप मतदार यादीत करण्यात आला. हा प्रकार अधिकच संशयित वाटल्याने दाभाडे यानी हवेली तहसिल कार्यालयात चैाकशी केली असता त्यांच्याकडे वाघोलीतुन एकही मतदार नोंदणी अर्ज प्राप्त झाला नसल्याचे समजले. तसेच तहसिलदारांच्या पत्राचा तलाठी यानी परस्पर वापर करण्यात आल्याचे समजले. यानंतर त्यानी त्या अर्जासेाबत जोडलेल्या काही कागदपत्रांची तपासणी केली असता त्यातील अऩेक कागदपत्रे बनावट असल्याचेही समेार आले आहे.

अशा प्रकारे बनावटपणा
1) मतदार नोंदणी अर्जाच्या गठ्ठयासेाबत जेाडलेल्या हवेली तहसिलदारांच्या पत्राचा परस्पर वापर. ते पत्रही बनावट असल्याचा संशय.
2) अर्जासेाबत जोडलेल्या अनेक प्रॅापर्टीच्या इनडेक्स - 2 ( सुची क्रमांक 2) ची एकाच दिवसात नेांदणी. त्यावर सारखाच दस्त क्रमांक.
3) अनेक मतदारांचे सोसायटी, इमारत व फ्लॅट नंबर एकच.
4) प्रॅापर्टी इंडेक्स - 2 वर केवळ फ्लॅट नंबर व मालकाचे नाव बदललेले. बदललेल्या नावाचा फाँट अन्य सर्व फाँट पेक्षा वेगळा.
5) जी प्रॅापर्टीची इंडेक्स प्रत जेाडण्यात आली आहे. त्या फ्लॅटचे  मुळ मालक वेगळेच.
6) महावितरणचे बिल बनावट. बिलावर ग्राहकाचे नाव व पत्ता बदलण्यात आला आहे. मुळ बिल दुसऱ्याच ग्राहकाच्या नावावर.
5) बहुतांश आधार कार्ड पुणे वगळता अन्य जिल्हयातील
6) अर्जावर अर्ज मंजुर- नामंजुर असा कोणताही शिरुर निवडणुक नायब तहसिलदारांचा शेरा व स्वाक्षरी नाही.

" एक जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान वाघेालीत नवीन नेांदणी झालेल्या मतदारांचा एकही अर्ज वाघोली तलाठी कार्यालयाकडुन हवेली तहसिल कार्यालयाला प्राप्त झाला नाही. ते अर्ज परस्पर शिरुर कार्यालयाकडे गेल्याचे समजते. दाभाडे यानी तक्रार केल्यानंतर नावे प्रारुप यादीत समाविष्ट झाल्याचे कळाले. याबाबत सविस्तर माहीती घेत आहे." - डॅा सुनिल शेळके, निवासी नायब तहसिलदार, हवेली.

" नवीन मतदारांच्या अर्जासेाबत जेाडलेल्या हवेली तहसिलदारांच्या पत्राचा परस्पर वापर केल्याचे दिसुन येते. आमच्याकडे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. वाघोली वगळता अऩ्य गावातील सर्व अर्जाची व पत्राची नेांद आमच्याकडे आहे." - सुनिल भगत, निवडणुक नायब तहसिलदार, हवेली

" वाघेालीतील अर्जाची तपासणी करुन व त्यावर मंजुर- नामंजुर शेरा मारणे ही हवेली तहसिल कार्यालयाची जबाबदारी आहे. त्यानंतर मंजुर नावे यादीत समाविष्ट करण्याची आमची जबाबदारी आहे. आमच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाला हवेली तहसिलदारांचे पत्र जेाडलेले हेाते. यासंदर्भात तक्रार मिळाली असुन त्याची सविस्तर माहिती घेत आहे. -रणजित भेासले, तहसिलदार, शिरुर.

"अर्ज व कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करताच ही नावे प्रारुप मतदार यादीत समावेश करण्यात आली आहे. त्यातील हजारो मतदार ओळखीचे नाहीत. त्यांनी जोडलेली कादगपत्रेही बनावट आहेत. वाघोलीतील बीएलओने भरुन घेतलेल्या नावांचा समावेश त्या यादीत झाला नाही. यामागे मेाठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. वाघोली ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच हा प्रकार करण्यात आला आहे. ती सर्व नावे मतदार यादीतुन वगळावेत. तसेच या प्रकरणाची सखेाल चैाकशी करुन दोषीं अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व बनावट कागदपत्रे बनविणाऱ्यांना व बनवून घेणाऱ्यांना शेाधुन त्यांच्यावर कारवाई करावी." - रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com