कॉग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांचे निधन

शरद रणपीसे (Sharad Ranapise) यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
Sharad Ranapise
Sharad Ranapise sarkarnama

पुणे : कॉग्रेसचे (Congress) आमदार शरद नामदेव रणपिसे (वय ७२) यांचे आज पुण्यात निधन झाले. काही दिवसापासून त्यांच्यावर पुण्यातील जोशी हॉस्पीटल येथे उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना त्यांचे आज निधन झाले. आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

शरद रणपीसे (Sharad Ranapise) यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली. गेली चार ते पाच दिवस त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरु होते. रामराज्य शिक्षण संस्थेचे ते संस्थापक होते.

Sharad Ranapise
बदनामी करणं हा चंद्रकांतदादांचा राजकीय धंदा ; राऊतांचा पलटवार

उर्दु शिक्षण संस्था, महाराष्ट्र युथ वेल्फेअर फांऊडेशन, रामराज्य सहकारी बँक आदी संस्थांमध्ये ते कार्यरत होते. १९७९ त १९८५ या दरम्यान शरद रणपीस पुणे महापालिकेचे सदस्य होते. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे ते सदस्य होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com