पुण्याची जागा काँग्रेसची, उमेदवार तेच ठरवणार : सुप्रिया सुळे

''पुण्याची जागा ही काँग्रेसची आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की पुण्याची जागा ही काँग्रेसची आहे,त्यामुळे तिथे उमेदवार कोण ते तेच ठरवणार, जसं बारामतीच्या जागेबाबत राष्ट्रवादीच निर्णय घेणार," असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.
पुण्याची जागा काँग्रेसची, उमेदवार तेच ठरवणार : सुप्रिया सुळे

पुणे : ''पुण्याची जागा ही काँग्रेसची आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की पुण्याची जागा ही काँग्रेसची आहे,त्यामुळे तिथे उमेदवार कोण ते तेच ठरवणार, जसं बारामतीच्या जागेबाबत राष्ट्रवादीच निर्णय घेणार," असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले.

प्रवीण गायकवाड यांना पुण्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. आज सकाळी गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. त्यानंतर राजकीय चर्चा सुरु झाली. मात्र, पुण्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न काँग्रेसचा असल्याचे सांगत सुप्रिया सुळे यांनी या चर्चेवर पडदा टाकला.

आज गायकवाड यांच्याबरोबरच शिवसेनेत असलेले अभिनेते डाॅ.अमोल कोल्हे यांनीही पवार यांची भेट घेतली. त्यावरूनही राजकीय चर्चा सुरु झाली होती.  त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, डाॅ. अमोल कोल्हे बारामतीत कार्यक्रमाच्या निमित्ताने  आले आहेत. त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली. त्यामुळेच त्यांचा साहेबांबरोबर फोटो आहे.  पवार साहेब राजकारणात आल्यापासून त्यांना रोज अनेक लोक भेटतात मग प्रत्येकाच्या भेटीचा हाच अर्थ काढणार का? असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.कोणाच्याही नावाची चर्चा आम्ही करत नाही, चर्चा बाहेरूनच होते, आमच्याकडून कुठलेही अधिकृत वृत्त दिलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "त्यांनी आघाडीत यावे, अशी आमची इच्छा आहे आणि ती शेवटपर्यंत राहील. आम्ही त्यांचे मान सन्मानाने स्वागत करु. आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे यासाठी आमचे प्रयत्न शेवटपर्यंत राहतील. त्यासाठी अजितदादा आणि छगन भुजबळ यांनी अनेकवेळा त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे आमची मनापासून इच्छा आहे की त्यांनी आमच्या आघाडीत यावे.''

जप केला की रुग्ण बरे होतात, अशा आशयाचे वक्तव्य औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज केले. त्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, चंद्रकांत खैरेंसारख्या अनुभवी लोकप्रतिनिधी कडून अशा वक्तव्याची मुळीच अपेक्षा नाही.आपल्याकडे जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. तरीदेखील अशी वक्तव्य लोकप्रतिनिधी कडून होत असतील तर त्याचे मला आश्चर्य वाटते. हे वक्तव्य हास्यास्पद आहे. शिवसेनेला प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांची परंपरा आहे. त्याच शिवसेनेच्या खासदरकडून २१ व्या शतकात अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com