शेतकरी, व्यापारी समन्वयातून बाजार समिती सुरू ठेवा : बाळासाहेब पाटील

उपबाजार किंवा शेतकरी आणि अडत दुकानांच्या समन्वयातून भाजीपाला विक्रीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. त्याचा वापर करून जीवनावश्‍यक वस्तू लोकांपर्यंत पोचवता येतील.
patil balasaheb
patil balasaheb

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकरी व अडत व्यापाऱ्यांच्या समन्वयाने बाजार समित्या सुरू ठेवण्यास काहीच हरकत नाही. त्याला सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. 


मुंबई, पुण्यासह काही ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत. ती तेथील गरज आहे, असे स्पष्ट करून मंत्री पाटील म्हणाले, ""कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव,  तेथे होणारी गर्दी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मोठ्या शहरात भाजीपाला जीवनावश्‍यक वस्तूंची कमतरता पडू देणार नाही.

 राज्यात पुणे, मुंबईला मोठी चिंताजनक स्थिती आहे. नागरिकांनी त्याचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारला मदत करण्याची गरज आहे. घरात  राहा, बाहेर पडू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सगळेच सांगत आहेत, तरीही होणारी गर्दी चिंतेची बाब  आहे. अशीच गर्दी अनेक बाजार समित्यांमध्ये झाली.

बाजार समित्यांमध्ये शेतकरी व अडत व्यापाऱ्यांचा व्यवहार असतो. मात्र, तेथे स्थानिक  नागरिकही येऊ लागल्याने गर्दी होऊ लागली. परिणामी पुणे, मुंबईसारख्या काही मोठ्या शहरातील बाजार समित्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

 वास्तविक शेतकरी व अडत व्यापारी यांच्या समन्वयातून भाजीपाला पोचविण्याचे काम करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी लागेल ते  सहकार्य सरकार करणार आहे. उपबाजार किंवा शेतकरी आणि अडत दुकानांच्या समन्वयातून भाजीपाला विक्रीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. त्याचा  वापर करून जीवनावश्‍यक वस्तू लोकांपर्यंत पोचवता येतील.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com