Pune News: बेभान प्रियकराचा प्रेयसीच्या बहिणीवर गोळीबार; पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?

Pune Crime News: पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका तरुणाने चक्क प्रेयसीच्या बहिणीवरच गोळीबार केला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama

Pune Crime News: पुण्यात (Pune) गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका तरुणाने प्रेयसीची भेट झाली नाही म्हणून प्रेयसीच्या बहिणीवर गोळीबार केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीच्या बहिणीवर गोळीबार करण्याऱ्या आरोपीचं नाव ऋषी सुनील बागूल असं आहे. या आरोपीच्या गोळीबारात प्रेयसीची बहीण जखमी झाली आहे. तर ही धक्कादायक घटना गंज पेठेत पहाटेच्या वेळी घडली आहे. तर आरोपी ऋषीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

वरिष्ठ पोलिस (Police) निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं की, गोळीबारात जखमी झालेल्या तरुणीची मावस बहीण घटस्फोटित असून, तिचे आरोपी ऋषीसोबत प्रेमसंबंध होते. मागील काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे प्रेयसीने आरोपी ऋषीशी बोलायचं बंद केलं होतं. शिवाय त्यांनी आपल्याशी संपर्क करु नये म्हणून तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. मोबाईल नंबर ब्लॉक केल्यामुळे प्रेयसीशी संपर्क करणं अशक्य झालेल्या आरोपीने थेट प्रेयसीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासाठी तो पहाटे दोन वाजता एका मित्राबरोबर प्रेयसीच्या गंज पेठेतील घरात आला. यावेळी त्याने प्रेयसीला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु ती घरी नसल्यामुळे तक्रारदार तरुणी आणि तिची आणखी एक मावस बहिण घरात होत्या. या दोघींनी आरोपी ऋषीला त्यांची बहीण घरात नसल्याचं सांगितलं. यावर त्याने या दोघींनी तिला फोन करायला सांगितलं. परंतु तिच्याशी संपर्क न झाल्यामुळे रागवलेल्या ऋषीने थेट तक्रारदार तरुणीवर बंदुकीतील गोळ्या झाडल्या.

Pune Crime News
Ravindra Dhangekar News: 'त्या' भाजप कार्यकर्त्यांवर इंडिया आघाडी सत्तेत आल्यावर कारवाई करणार का? धंगेकरांचा सवाल

या गोळीबारात तक्रारदार तरणीच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली. तर गोळीबार होताच घाबरलेल्या दोघी तरुणींनी घरात जाऊन लपल्या. तर आरोपीने घरातून जाताना कोणाला सोडणार नसल्याची धमकी दिली. दरवाजाला बाहेरून कडी लावून तो तिथून पळून गेल्याचं तरुणीने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर खडक पोलिसांनी (Khadak Police) आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश जाधव करीत आहेत.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com