कोरेगाव भीमा, सणसवाडी संवेदनशील; सीआरपीएफच्या तुकड्या मतदानाच्या दिवशी तैनात

कोरेगाव भीमा, सणसवाडी संवेदनशील; सीआरपीएफच्या तुकड्या मतदानाच्या दिवशी तैनात

कोरेगाव भीमा : राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडत असताना संवेदनशील अशा काेरेगाव भीमा,
सणसवाडी मतदान केंद्रावर निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांसह सीआरपीएफची तुकडी बंदाेबस्तासाठी नेमण्यात आली आहे. नुकतेच पोलिसांसह सीआरपीएफच्या तुकडीने कोरेगाव सणसवाडीत संचलनही केले. 29 एप्रिल रोजी येथे मतदान होत आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात असलेल्या काेरेगाव भीमा व सणसवाडी येथे १ जानेवारी २०१८ ला हिंसाचार झाला हाेता. त्याचे पडसाद राज्यभरात उमटल्यामुळे या ठिकाणी काेणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या वेळी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून काेरेगाव भीमा येथील मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
तसेच त्याचे वेब कास्टिंगही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे. निवडणुकीच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जम्मु काश्मिर येथील सीआरपीएफच्या जवानांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.

 शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११५ बुथ व ३५ इमारतीवर सात पोलिस अधिकाऱ्यांसह ७५ होमगार्ड व सीआरपीएफच्या जवानांची एक तुकडी यासह पुरेसा बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहे. तसेच कोरेगाव भीमा , सणसवाडी, शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथे पोलिस संचलनही करण्यात आले. तसेच पेट्रोलिंगही सुरू आहे. दरम्यान या बुथवर कोणालाही मोबाईल व तत्सम डिव्हाईस नेता येणार नसल्याचे शिक्रापरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com