नगरसेवकांकडे आयुक्तांच्या नावाने पैशाची मागणी : IAS राजेश पाटील यांची तक्रार

सायबर चोरट्यांचा PCMC आयुक्तांनाच हिसका
rajesh patil pcmc
rajesh patil pcmcsarkarnama

पिंपरीः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) आयुक्त राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी वर्षभराच्या कारकिर्दीत आपल्या कामाची छाप पाडली आहे. त्यातून प्रामाणिक आणि धडाकेबाज अधिकारी अशी प्रतिमा त्यांची अल्पावधीत तयार झाली आहे.मात्र,अशा या अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी हिसका दाखवला आहे. त्यांच्या फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करीत ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवकांना फसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आहे. आयुक्तांच्या फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर करीत अॅमेझानव्दारे भेटींची मागणी नगरसेवकांसह नागिरकांकडेही सदर सायबर गुन्हेगाराने केली आहे.

rajesh patil pcmc
विश्वजित कदम यांची कसोटी; राष्ट्रवादीनेच केलीय गंमत

दरम्यान, पिंपरी महापालिकेवरील हा दुसरा सायबर हल्ला आहे. गेल्यावर्षी स्मार्ट सिटीच्या कमांड सेंटरवर सायबर अटॅक झाला होता. त्यावेळी पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता.त्यानंतर आता,तर थेट आयुक्तच सायबर क्राइमचे बळी ठरले आहेत. हा प्रकार समजताच पिंपरी पालिकेच्या वतीने शहर पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली.ती मिळाली असून इतर पूरक माहिती घेण्याचे काम सुरु असल्याने अद्याप एफआयआर दाखल केला नसल्याचे सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय तुंगार यांनी मंगळवारी `सरकारनामा`ला सांगितले. दुसरीकडे पालिकेचा माहिती आणि तंत्रज्ञान विभाग व त्यातही या विभागाचे प्रमुख असलेले माहिती,तंत्रज्ञान अधिकारी हे अकार्यक्षम असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.

rajesh patil pcmc
95 नगरपंचायती, दोन जिल्हा परिषदांत चुरशीने मतदान : विजयाचा गुलाल कोणाचा?

पालिकेच्या तक्रारीनुसार 7524891151 या मोबाईल नंबरवरुन व्हॉटस्अपच्या माध्यमातून नगरसेवक आणि अन्य नागरिक यांच्याशी फेक आयडी लावून ऑनलाईन चॅटींग करुन आर्थिक मदत मागण्यात आली आहे. 7977510080 दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरुनही व्हॉटस्अपच्या माध्यमातून अशाच प्रकारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात आहे.

त्यामुळे सर्व पालिका पदाधिकारी, अधिकारी आणि शहरवासियांना आवाहन करण्यात आले आहे की अशा प्रकारे होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी सदर क्रमांकावरुन अथवा अन्य क्रमांकावरुन फेक प्रोफाईल आयडीद्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी मान्य करू नये. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करु नये. त्याबाबत पोलीसांशी संपर्क साधावा,असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. अशा प्रकारे कोणतीही मागणी करण्यात येत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com