दौंडची जागा रासपचीच, राहुल कुल हेच पुढील उमेदवार : महादेव जानकर   

महादेव जानकर यांनी दौंडची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने राहुल कुल आता भाजपतर्फे विधानसभा लढणार या चर्चेला ब्रेक लागणार आहे .
jankar_kool
jankar_kool

यवत :  " दौंडमध्ये रासपचा विद्यमान आमदार आहे. नैसर्गिक न्यायाने ही जागा रासपकडेच राहणार आणि राहुल कुल हेच पुढील उमेदवार असणार. दौंडसह रासपचा प्रभाव असलेल्या माढा, अहमदपूर, भूम, कळंबोली, परांडा, माण खटाव, पंढरपूर, फलटण या मतदारसंघांसह पंधरा जागांची पक्षाची मागणी आहे. किमान बारा जागा तरी आम्हाला मिळतील,"  असे पशुसंवर्धन मंत्री व रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी सांगितले.

महादेव जानकर यांनी दौंडची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने राहुल कुल आता भाजपतर्फे विधानसभा लढणार या चर्चेला ब्रेक लागणार आहे . त्यामुळे राहुल कुल यांना रासपतर्फे लढण्याशिवाय पर्याय राहणार नाही .

जानकर हे चौफुला (ता. दौंड) येथे आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,  "आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष व रासप यांची महायुती असणार आहे. या महायुतीमधून मागील निवडणुकांवेळी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 9 जागा दिल्या होत्या. मात्र, आता ते महायुतीत नाहीत. त्यामुळे या जागा आता रासप व रिपब्लिकन पक्ष यांना द्याव्यात, अशी मागणी महायुतीकडे आपण करणार आहे,'' 

 " मागील विधानसभा निवडणुकी वेळी महायुतीच्या जागा वाटपात रासपला सहा, रिपब्लिकन पक्षाला तीन आणि स्वाभिमानीला नऊ जागा दिल्या होत्या. रासपने सर्व जागांवर चांगली लढत दिली. दौंडच्या जागेवर विजयही मिळवला. राज्यात आणि देशात रासपला समाधानकारक मते मिळाली आहेत, त्यामुळे पक्षाला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून महायुतीने रासपला पंधरा जागा सोडाव्यात, अशी माझी मागणी आहे. मात्र, ही मागणी महायुतीने मान्य केली नाही; तरी वेगळा विचार वगैरे काही नाही. आमची क्षमता आम्हाला माहीत आहे. आपली औकात आपल्या चौकात, या न्यायाने राजकारण केलं पाहिजे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com