Devendra Fadnavis: ...अन् लक्ष्मणभाऊंची 'ती' आठवण सांगताना देवेंद्र फडणवीसांचा कंठ दाटला!

Devendra Fadnavis: लक्ष्मण जगतापांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप प्रथमच सत्तेवर आला...
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama

Devendra Fadnavis & Laxman Jagtap News : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं ३ जानेवारी रोजी कर्करोगानं निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी (ता.१४) सर्वपक्षीय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात लक्ष्मणभाऊंची अनेक आठवणींना उजाळा दिला. मात्र, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी घडलेला तो प्रसंग सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंठ दाटून आला.

लक्ष्मण जगतापांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा विस्तार होऊन पक्ष प्रथमच महापालिकेत सत्तेवर आला या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्व. आ. जगतापांच्या कामाची पावती दिली. शहरासाठी त्यांचं प्रचंड योगदान आहे. म्हणून पिंपरी पालिका उभारीत असलेल्या कर्करोग रुग्णालयाला त्यांचं नाव देण्याची घोषणा त्यांनी केली.

तसेच शहरात लक्ष्मणभाऊंच्या नावानं विधी महाविद्यालय सुरु करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.त्यांचं स्वप्नं असलेल्या भंडारा डोंगरावरील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज मंदिरासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही फडणवीसांनी यावेळी दिले.

Devendra Fadnavis
Shashi Tharoor:''...म्हणून २०२४ ला भाजप सत्ता स्थापन करु शकणार नाही!''; शशी थरुर असं का म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यसभा निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवार निवडून येण्याचे गणित आम्ही मांडत होतो, मते कमी होती. अशा परिस्थितीत लक्ष्मणभाऊंची तब्येतही खालावलेली असल्यानं त्यांना आणायचं की नाही असा सवाल आमच्यासमोर उभा होता. गिरीश महाजन त्यांच्या संपर्कात होते. लक्ष्मणभाऊंनी शंकर जगताप यांच्याकरवी निरोप दिला. शंकर जगताप यांनी आम्हांला मतदानासाठी भाऊ येणार आहेत. इतकी तब्येत खालावलेली असताना पीपीई कीट घालून लाईफ सेव्हिंग रुग्णवाहिकेद्वारे पूर्णपणे झोपून त्यांनी मुंबई गाठली.

आम्ही सर्वजण दरवाजातच त्यांना घ्यायला उभे होतो. पीपीई किट, मास्क घातलेले लक्ष्मणभाऊ चाचपडत खाली उतरले. विरोधी पक्षनेते असताना ते सॅल्युट करून म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब तुमच्यासाठी आलो. आजही ती आठवण आली की डोळे भरून येतात. ही आठवण सांगत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे डोळे भरून आले.

Devendra Fadnavis
Ganga Vilas River Cruise News : मोदींच्या गंगा विलास रिव्हर क्रूझला 'या' राज्यांची आडकाठी

लक्ष्मणभाऊ हे अजब रसायन होतं.लाडकं आणि उमदं व्यक्तिमत्व होतं.लोकांशी,जमिनीशी जोडलेले सर्वसामान्यांचे ते नेते होते,असं फडणवीस म्हणाले. प्रखर इच्छाशक्तीमुळे त्यांनी एवढा मोठा काळ दुर्धर आजाराशी लढा दिला. योगदिनी भाऊ करत असलेले योगप्रकार पाहून थक्क व्हायचो,एवढं त्यांचं शरीर लवचिक होते. नाहीतर,तर आम्ही त्या दिवशी फक्त फोटोसाठी योगा करायचोअसेही फडणवीस म्हणाले.

या सभेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, क्रीडामंत्री गिरीश महाजन, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे, भाजपच्या विधान परिषद सदस्य उमा खापरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप, आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार विलास लांडे, मनसेचे नेते बाबू वागस्कर यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com