Tukaram Mundhe यांच्या कामाचा धडाका सुरू ; अनुपस्थित डॉंक्टरांवर कारवाई करणार

Tukaram Mundhe : डॉक्टर उपस्थित नसल्यास जागेवरच निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhesarkarnama
Published on
Updated on

पुणे : आरोग्य विभागाचा कार्यभार हाती घेताच तुकाराम मुंढे (tukaram mundhe) यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. (tukaram mundhe latest news)

पुणे विभागातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल (गुरुवारी) रात्री तपासणी केली. कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतात की नाही याची माहिती मुंढे यांनी घेतली.

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्र सुरु आहे. डॉक्टर उपस्थित नसल्यास जागेवरच निलंबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

Tukaram Mundhe
Dasara Melava : आव्वाज कुणाचा ? ; राणांचा दावा खरा ठरला ; ठाकरेंचे भाषण फुसका बार, शिंदेंनी तोफ डागली..

गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी आळंदी, वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली, तेथे डॉक्टर उपस्थित असल्याने कारवाई टळली. ग्रामीण भागात गाव पातळीवर आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाने उत्कृष्ठ कामाची अपेक्षा मुंढे यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com