ED Action: पुण्यात ईडीची मोठी कारवाई; रोझरी स्कूल संचालकांचे 47 कोटींची संपत्ती जप्त!

Vinay Aranha: विनय आऱ्हाना यांनी अटक झाली आहे.
Vinay Aranha
Vinay AranhaSarkarnama
Published on
Updated on

Rosary Education Group: पुण्यातील नामांकित रोझरी स्कूलचे संचालक विनय आर्‍हाना ( Vinay Aranha) यांना ईडीने काही दिवसांपूर्वीच ईडीने (ED) अटक केली होती. न्यायालयाने विनय आर्‍हाना यांना 20 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. आता ईडीने आर्‍हाना यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. आऱ्हाना यांची 47 कोटी संपत्ती जप्त केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत लष्कर भागातील रोझरी स्कूलची इमारत, तसेच आऱ्हानाच्या मालकिची जमिनीचा देखील समावेश आहे. आऱ्हानाच्या एकूण चार मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

Vinay Aranha
ED Action : ईडीची पुण्यात मोठी कारवाई; रोझरी स्कूलचे संचालक आर्‍हानाला अटक

रोझरी स्कूलचे संचालक विनय आऱ्हाना आणि विवेक आऱ्हाना याच्या विरूद्ध कॉसमॉस बँकेकडून (Cosmos Bank) आर्‍हानाने चुकीच्या पध्दतीने कर्ज घेतल्याचा आरोप आहे. शाळांच्या नुतणीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाव्दारे मिळालेल्या पैशाचा उपयोग आर्‍हानाने हायफाय लाईफस्टाईलसाठी केला, असाही आरोर करण्यात आला आहे. तसेच बॉलीवूडमधील लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अंमलबजावणी संचालनायाकडून सुरू असलेला तपासात या बाबी समोर आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाइी आर्‍हानाची रवानगी ईडीच्या कोठडीत करण्यात आली आहे. ईडीने अटक करून आर्‍हानाला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com