Rahul Kul
Rahul Kul

 राहुल कुल यांच्यासाठी भीमा पाटस कारखान्याला मुख्यमंत्र्यांनी  मिळवून दिले  36 कोटींचे कर्ज

राहुल कुल साखरेच्या जागतिक बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास करतात. कुल यांनी 2008-09 मध्ये कारखान्याच्या साखरेची विक्री थांबविली होती. गेल्या वर्षीही अन्य कारखान्यांनी 2300 ते 2400 रूपये दराने साखर विकली. कुल यांनी गेल्या वर्षी साखर विकली नाही. तीच साखर आता सुमारे 3500 दराने विकली जात आहे. या निर्णयामुळे कारखान्याला काही कोटीत फायदा झाला आहे.

 केडगाव  ( जिल्हा पुणे ) :  बंद पडलेल्या भीमा पाटस कारखान्याला कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खास बाब म्हणून 36 कोटी रूपयांचे कर्ज मिळवून आणले आहे . 

 रविवारी ( ता.12 ) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ होत आहे. 

आपत्ती व्यवस्थापन निधीतून भीमा पाटस कारखान्याला कर्ज मिळविणे तशी सोपी गोष्ट नव्हती. हे कर्ज कसे योग्य आहे हे राज्य पातळीवरील अधिका-यांनी समजावून घेताना कुल यांचा मात्र अक्षरशः घाम काढला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र  50 हजार सभासदांचे हित जपण्यासाठी  कारखान्याला  कर्ज मिळालेच पाहिजे अशी भूमिका घेतली .   कुल यांच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी या कर्जासाठी प्रयत्न केले आणि यशही मिळाले . 

 केंद्रिय अर्थमंत्री अऱूण जेटली, राज्याचे मंत्री गिरीश बापट, पंकजा मुंढे, महादेव जानकर यांची या कामात मदत झाली. राज्याच्या इतिहासात असे कर्ज प्रथमच एका साखर कारखान्याला मिळाले आहे.   हे करण्यात वेळा फार गेला. कारखान्याची हंगाम सुरू व्हायची वेळ आली तरी कर्ज मिळण्यात अडथळे येत होते.कुल यांनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा चंग बांधला आणि त्यांना तो पुर्ण करण्यात यश आले.

 कारखान्याची यंत्रणा उभी करताना पैसे नसतानाही कुल व त्यांच्या संचालक मंडळाने यंत्रणा कामाला लावली. संचालक मंडळाने कामगारांमध्ये प्रशासनाबद्दल असंतोष असताना त्यांच्यात विश्वास निर्माण केला.  नवीन  कार्यकारी संचालकांनी पुर्णपणे कसब पणाला लावत उपलब्ध कामगारांकडून कमी वेळेत दुरूस्तीची कामे करून घेतली. 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राहुल कुल यांच्या पाठीशी भक्कम पाठबळ उभे केल्यानेच  हे शक्य झाले आहे. कुल यांची तशी फडणवीस यांच्याशी पुर्वी फार जवळीकता नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर  मुख्यमंत्र्यांच्या नजरेत  कुल यांचा अभ्यासूपणा भरला .  दौंडमधील भाजपचे  संघटन मजबूत करण्यासाठी कुल यांची धडपडही त्यांनी पहिली .  त्यामुळे मुख्यमंत्री  फडणवीस यांचे कुल यांच्याविषयी  अनुकूल मत तयार झाले   .   

याचा मोठा फायदा कुल यांनी भीमा पाटससाठी करून घेतला आहे. अन्यथा भीमा पाटस चालू करणे अवघड होते. आता ऊस तोडणीचे नियोजन झाले आहे. वाहतूकदारांना पैसे दिले आहेत. कामगारांचे चार पगार झाले आहेत. आता विषय राहिला आहे तो ऊस दराचा. राहुल कुल आता उसाला काय दर देणार याची प्रचंड उत्सुकता शेतक-यांमध्ये आहे.

 राहुल कुल यांनी उसाची पहिली उचल गु-हाळांच्या दराबरोबरची असेल असे जाहिर केले. यामुळे सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यंदा भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाच्या लागवडीत मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. कारखाना बंद राहिला तर पुढील वर्षी शेतक-यांना कारखानदारांच्या मागे  फिरावे लागेल, असे जाणकारांचे मत आहे. 

पुर्वी साखर कारखानदारी ही काटकसर करून चालविणा-याला साखर धंद्यात मान असायचा. आता ही परिस्थिती बदलली आहे. आता काटकसरी बरोबरच राष्ट्रीय व जागतिक पातळीवरील साखर विक्रीचा अभ्यास जो करेल त्याचा कारखाना स्पर्धेत टिकाव धरणार आहे. अन्यथा काटकसर करूनही उसाला योग्य भाव देता येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com