युवकांनो, तुमच्या शक्तीवर भरवसा ; जगाला सामर्थ्य दाखवा ; मोदींचे आवाहन

''विद्यार्थ्यांनो, देशाची गरज ओळखून शिक्षण घ्या. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतात, त्या क्षेत्रात संशोधन करा, तुमच्या ज्ञानाचा फायदा, शेतकरी, विद्यार्थ्यांना होईल, याचा विचार करा,'' असे मोदी म्हणाले.
Narendra Modi
Narendra Modisarkarnama

पुणे : ''विद्यार्थ्यांनो, तुमची पिढी नशीबवान आहे. तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत नाही. देशातील या बदलाचं श्रेय युवकांनाच जातं. ज्या क्षेत्रात देश आपल्या पायांवर पुढं जाण्याचा विचार करत नव्हता त्यात भारत ग्लोबल लीडर बनण्याच्या वाटेवर आहे,'' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi) यांनी रविवारी केले.

लवळे येथील सिम्बायोसिस विद्यापीठाच्या (Symbiosis University) सुवर्ण महोत्सव सोहळ्यात मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, ''जगातील सर्वात मोठं स्टार्ट अप हब भारतात आहे. स्टार्टअप, स्टँडअप इंडिया, आत्मनिर्भर भारत तुम्हाला प्रेरित करत आहे. आज भारत वेगाने प्रगती करीत आहे, जगावर प्रभाव टाकत आहे. कोरोना लसीच्या संदर्भात संपूर्ण जगासमोर भारतानं सामर्थ्य दाखवावं,''

''काही वर्षांपूर्वी मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं. आपण आयातीवर अवलंबून होतो. आज स्थिती बदलली आहे. मोबाईल निर्मितीत भारत जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे. 7 वर्षांपूर्वी भारतात दोन मोबाईल निर्मिती कंपन्या होत्या, आज दोनशेपेक्षा जास्त मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. 'संरक्षण क्षेत्रात सर्वात मोठा आयातदार होतो, आपण आता संरक्षण साहित्याचे निर्यातदार बनत आहोत,'' असे मोदी म्हणाले.

''स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात देश नव्या संकल्पासह पुढं जात आहोत. आज सॉफ्टवेअर क्षेत्र, एआय, एआर, मशीन लर्निंग या क्षेत्रात नव्या संधी बनत आहेत. देशात जिओ स्पेशल सिस्टीम, ड्रोन, सेमी कंडक्टर आणि इतर क्षेत्रात बदल होत आहेत. हे बदल आपल्यासाठी संधी घेऊन आले आहेत. तुम्ही टेक्निकल, मॅनेजमेंट आणि मेडिकल फिल्डमध्ये असाल तरी ही संधी निर्माण होत आहे. ती तुमच्यासाठी आहे. देशातील सरकार युवकांच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवते,'' असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

Narendra Modi
#GoBackModi:युक्रेनमध्ये मुलांना मृत्यूच्या दाढेत सोडून मोदी प्रचार करताहेत!

''विद्यार्थ्यांनो, देशाची गरज ओळखून शिक्षण घेणे गरजेचे करावे, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतात, त्या क्षेत्रात संशोधन करा, तुमच्या ज्ञानाचा फायदा, शेतकरी, विद्यार्थ्यांना होईल, याचा विचार करा,'' असे मोदी म्हणाले.

''ऑपरेशन गंगा (Operation Ganga)हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक आहे. सर्व अडकलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,'' असे मोदी यांनी सांगितले. 'सिम्बायोसिस'चे संस्थापक डॉ. शां.ब.मुजुमदार यांनी मोदींचे स्वागत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com