भाऊंची आघाडीधर्माची अपेक्षा : कार्यकर्ते म्हणतात, तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा!

भाऊंची आघाडीधर्माची अपेक्षा : कार्यकर्ते म्हणतात, तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा!

भवानीनगर : मित्रपक्ष आघाडी धर्म पाळेल अशी अपेक्षा असं माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तुम्ही म्हणाल अन ठरवाल ती पूर्वदिशा म्हणत प्रतिसाद दिला आणि इंदापूर तालुक्यातील विधानसभेच्या तयारीसाठी तालुक्याच्या पश्चिम भागातून हर्षवर्धन पाटील जो निर्णय घेतील, त्यास संमती दिली.

हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यातील गावभेट दौऱ्याची सपकळवाडी, तावशीतून आज सुरवात झाली. तावशीत गावातील तरुणांसह ज्येष्ठांनी मोठी गर्दी अगदी सकाळी- सकाळी केल्याने पाटीलही खुश होते. 

पाटील यांच्यासमोर भाषण करताना सपकळवाडीत ज्येष्ठ नेते बी.के. सपकळ यांनी अप्रत्यक्षरित्या राज्यभरात जी सध्याची राजकीय अस्थिरता आहे, त्याचा धागा पकडला आणि ते म्हणाले,`आता काय होईल ते परमेश्वरालाच माहित`  त्यांनी हे विधान केले, त्यावेळी हर्षवर्धन पाटील हे सपकळवाडीत लोकसभेचे मतदान बुथनिहाय कसे झाले याची आकडेवारी घेत होते, ते एकदम अवाक झाले. त्यांनी सपकळ यांच्याकडे पाहत परमेश्वराला माहिती म्हणजे काय, असा सवाल केला आणि त्यांच्यासह उपस्थितांपैकी अनेकांना हसू आवरले नाही. अर्थात राज्यातील आमदारांच्या पळवापळवीचा मुद्दा स्थानिक पातळीवरही आघाडीच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत असल्याचे हे चित्र अगदीच अधोरेखित झाले. 

१२ ऑगस्टला शक्तिप्रदर्शन नाही

पाटील यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कॉंंग्रेसचा गावभेट दौरा संपवून १२ ऑगस्ट रोजी मोठा मेळावा घेऊन त्यामध्ये भूमिका जाहीर करण्याचे ठरवले होते. मात्र आज (ता.२) त्यांनी इंदापूर तालुक्याचा दौरा पूर्ण होत नसल्याने १२ ऐवजी नंतर हा मेळावा घेण्याचे जाहीर केले. अर्थात आघाडीतील जागावाटपाचा निर्णय त्या दिवसापर्यंत होण्याची शक्यता नसल्याने त्यांनी १२ ऑगस्टचा मूहूर्त पुढे ढकलल्याची चर्चा येथे होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com