Raj Thackeray Live : मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नसल्याने निवडणुका पुढे ढकलल्या..

मनसेचा (MNS) वर्धापनदिन पुण्यात उत्साहात
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama

मला जात कळत नाही. मी बघत नाही. माझे सहकारी म्हणून देखील तुम्ही असेच असले पाहिजेत. 21 मार्च रोजी शिवजयंती आहे. आधी तारखेने साजरी झाली. आता तिथीने आहे. आपल्या शिवछत्रपतींची जयंती आहे. आपली ओळखच त्यांच्यामुळे आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही मराठी भाषा बोलणारे आहोत म्हणून मराठी आहोत. शिवाजी नावाचा विचार असलेल्या भूमीत आम्ही राहतो. तारखेने करावी की तिथीने करावी? त्यांची जयंती 365 दिवस करा. ज्याला वाटेल त्याला त्या दिवशी करा. तिथीने का करावी? कारण आपण आपले सगळे सण हे तिथीने करतो. प्रत्येक सण हा तिथीनुसार साजरा होता. हा आपल्या राजाचा जन्मदिवस हा सण आहे. हा महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा सण आहे. तो सण म्हणून तिथीने साजरा करायचा आहे. त्यामुळे 21 मार्च रोजी हा सण साजरा करा- राज ठाकरे

कोरोना काळात मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केले. तुमच्या पोटातील आग ही महाराष्ट्रासाठी वापरा.- राज ठाकरे

प्रश्न सोडविण्यासाठी लोक सरकारकडे जात नाहीत.. राज ठाकरेंकडे येतात. कारण त्यांना विश्वास आहे की प्रश्न येथेच सुटणार- राज

लोकांच्या समस्येविषयी कोणाला काय पडलयं? हे काय करतायत तर एकमेकांवर रेड टाकतायत...- राज ठाकरे

ते संजय राऊत किती बोलतात... राऊत यांची अॅक्शन करून दाखवली...

सत्तधारी आणि विरोधक हे दोघेही आम्हाला संपविण्याची भाषा करत आहेत. मग उरलं कोण? कार्यकर्त्यांच्या टाळ्या..

हा आता ट्रिजर आहे..  पूर्ण पिक्चर दोन एप्रिल रोजी गुढिपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर-राज

या निवडणुका आता दिवाळीनंतर होतील- राज यांचा दावा

या निवडणुका होऊ नयेत आणि प्रशासक नेमावा. सरकारही हातामध्ये आणि प्रशासक यांचाच. सारे आम्हीच पाहणार- राज यांची सरकारवर टीका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरपासून सांगत होतो. निवडणूक आली की ती चढायला लागते. ती स्पर्श करते. वातावरणात मला निवडणूक दिसत नव्हती. आमच्या ओबीसी समाजाचे कारण पुढे केले. त्यांची मोजणी करायची वगैरे कारण दिले. मला वैयक्तिक कोणाविषयी बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाही. हे निवडणूक पुढे ढकलण्याचे खरे कारण आहे.

राज ठाकरे यांची राज्यपालांवर टीका. तुम्हाला शिवाजी महाराज, रामदासस्वामी काही कळत का? तुमचा काही अभ्यास आहे का? छत्रपतींनी कधी सांगितलं नाही की रामदासस्वामी माझे गुरू नव्हते की रामदासस्वामी म्हणाले नाहीत की ते माझे शिष्य आहेत. पण रामदासस्वामी यांनी छत्रपतींबद्दल जे लिहिलयं तसे आतापर्यंत कोणी लिहिलं नाही. ते माझ्या घरात मी लावलेलं आहे. श्रीमंत योगी, असं रामदासस्वामींनी लिहून ठेवलयं. आमच्या महापुरूषांना बदनाम करून तरुणांची माथी भडकावयची. एवढाच उद्योग चाललयं- राज ठाकरे 

आम्हाला इतिहास नाही बघायचा. जात बघायची आहे. राजकीय पक्षांना तुम्हाला जातीपातीत अडकवायचयं- राज ठाकरे

प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतात. फक्त लतादिदींच्या आयुष्यात तो आला नाही. मात्र त्यांना ते सहज जमलं नाही. त्यांनी प्रचंड कष्टातून दिवस काढले.

आपल्या पक्षावर, माझ्यावर संकट सुरूच आहेत. संकट येतात तेव्हा ती हातात हात घालून येतात. जाताना एकटी जातात. त्यामुळे वेळ लागतो. माझ्याही आयुष्यात आली. पक्षाच्याही आयुष्यात आली. असे प्रसंग येत असतात. पण या प्रसंगातून घाबरून न जाता हे प्रसंग आपल्याला शिकवून जातात. यातन आपण घेतलं काय, या सर्व गोष्टी घेऊन कुठे जाणार आहोत, हे समजायला हवं. माझे मनसैनिक याही काळात माझ्याबरोबर राहिलात. त्याबद्दल धन्यवाद- राज ठाकरे

कोरोनासारखे दिवस पाहू, असे वाटले नव्हते. सहज स्पर्श करायला भीती वाटायला लागली. घरातल्या माणसाने दिलेला ग्लास उचलावा की न उचलावा, अशी शंका यायला लागली. 

जमलेल्या हिंदू माता भगिनींनो आणि बांधवांनो, अशा वाक्याने राज यांची भाषणाला सुरवात. गेली दोन वर्षे मी भाषण केले नाही. मुलाखती दिल्या. पाच मिनिटे, दहा मिनिटे बोललो. पण भाषण नाही केलं. दोन वर्षे मी कुठे काही बोललोच नाही. मी काय बोललो नाही. तुम्ही पण काही बोलला नाही. त्याच्यामुळे आज वर्धापनदिनाला भाषण करताना प्रॅक्टिस सुटली नाही ना, अशी शंका येत होती. मनसेच्या सोळाव्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद व्यक्त करतो.- राज ठाकरे

अमित ठाकरे यांच्यासाठी येणारा काळ हा सुवर्णकाळ असेल.  आता नुसतं लढायच नाही आता जिंकायचं.  कोरोना काळात मनसेचा कार्यकर्ता लोकांसाठी दिवसरात्र झटत होता.  आमच्याकडे आमदार, खासदार नसले तरी आमच्याकडे ते बनवणारे निर्माते आहेत.- नांदगावकर यांचा विश्वास

हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब- बाळ नांदगावकर यांनी गायले गाणे

आता निवडणुका लढवायच्या नाहीत तर जिंकायच्या : नांदगावकर

मनसेच्या वर्धापन दिनाला मोठी गर्दी अमित ठाकरेंचा साधेपणाच दर्शन पहिल्या रांगेत न बसता पाचव्या रांगेत बसले अमित ठाकरे कार्यकर्त्यांसोबत बसण्याचा आग्रह धरत अमित ठाकरे यांनी नाकारलं पहिल्या रांगेत बसणं मनसे वर्धापन दिन यंदा पुण्यात १६ वा मनसे चा वर्धापन पुण्यात साजरी होतोय प्रथमच मनसेचा वर्धापनदिन मुंबई बाहेर पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिरात वर्धापन दिन होतोय साजरा अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसेचे राज्यातून पदाधिकारी उपस्थित.

मनसे प्रमुख राज ठाकरे गणेश कला रंगमंदिरात दाखल काहीच वेळात होणार भाषणाला सुरुवात मनसे च्या १६ व्या वर्धापन दिनाला पुण्यात मोठी गर्दी अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे सह राज्यभरातून मनसे पदाधिकारी हजर

बाळ नांदगावकर यांचे भाषण- पुण्यातील वातावरण बदलतयं. सोळावं वरिस धोक्याचं.... विरोधकांसाठी आणि मनसेसाठी मोक्याचं

MNS Pune gathering
MNS Pune gatheringsarkarnama

मनसेचा पहिल्यांदाच पुण्यात वर्धापनदिन साजरा होत आहे. या आधी मुंबईत वर्धापनदिन साजरे झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com