आशा बुचकेंसाठी माझे तिकिट कापले...तेव्हा मी शांतच राहिलो : आमदार सोनवणे

आशा बुचकेंसाठी माझे तिकिट कापले...तेव्हा मी शांतच राहिलो : आमदार सोनवणे

आळेफाटा : " आशा बुचके यांच्यासाठी शिवसेनेने माझे 2014 मध्ये तिकिट कापले. तेव्हा मी पक्षाच्या विरोधात शब्दाने बोललो नव्हतो, असे सांगत जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी कोणताही माणूस पक्षापेक्षा मोठा नाही, हे स्पष्ट केले.

शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर जुन्नरमधील राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत खुद्द माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद सादला.

चाळकवाडी (पिंपळवंडी) ता. जुन्नर येथे आमदार शरद सोनवणे यांच्या 'रायगड' या संपर्क कार्यालयात तालुक्यातील घडमोडींविषयी वास्तव मांडण्यासाठी (ता.28) शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना आमदार शरद सोनवणे म्हणाले की, माझ्यावर परिस्थिती आली (तिकीट कापले), तेंव्हाही मी एका शब्दानेही पक्षाविरोधात बोललो नाही. कुणीही माणूस पक्षापेक्षा मोठा नाही. आशाताई बरोबर आमचा संघर्ष नाही. प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी जाऊन संघटनावाढीचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आढळराव म्हणाले की बुचके यांना शिवसेनेने चार वेळा जिल्हा परिषद व दोन वेळा आमदारकीची उमेदवारी दिली तसेच जिल्हा परिषदेत गटनेतेपद दिले, त्यांच्यावर पक्षाने अन्याय केला नाही. त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याविषयी वक्तव्ये केली. त्यांच्या पक्षातून हकालपट्टीचे कारण हे त्यांच्या पक्षविरोधी कारवाया असून, यामध्ये माझ्या लोकसभेच्या पराभवाचा कुठलाही संबंध नाही.

आमदार शरद सोनवणे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचीही त्यांना स्पष्ट कल्पना होती. विधानसभेला शिवसेना जुन्नर तालुक्यात एक नंबरचा पक्ष आहे असेही ते यावेळी म्हणाले.

आशा बुचके यांच्यावरील कारवाईमुळे वाईट वाटले, पण त्यांनी शिवसेना सोडू नये. आपण निष्ठावंत शिवसैनिक आहोत. शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे व आशा बुचके यांच्यासह सर्वांनी विचार करून, तालुक्यात दुफळी होणार नाही याची काळजी घ्यावी अशी माझी इच्छा आहे, असे मत यावेळी माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com