#कारणराजकारण : बारामतीतल्या तरुणाईच्या दृष्टीने शरद पवारच महत्त्वाचे नेते

बारामतीतल्या तरुणाईला राजकारणाविषयी काय वाटतं हे जाणून घेत असताना लक्षात येते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हेच इथल्या तरुणाईसाठी महत्वाचे नेते आहेत. ई-सकाळच्या टीमने आज सकाळी बारामतीच्या टी. सी. काॅलेजमध्ये जाऊन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून तरुण-तरुणींची राजकारण, सध्याच्या निवडणुका याबाबतची मते जाणून घेतली.
#कारणराजकारण : बारामतीतल्या तरुणाईच्या दृष्टीने शरद पवारच महत्त्वाचे नेते

बारामती : बारामतीतल्या तरुणाईला राजकारणाविषयी काय वाटतं हे जाणून घेत असताना लक्षात येते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हेच इथल्या तरुणाईसाठी महत्वाचे नेते आहेत. ई-सकाळच्या टीमने आज सकाळी बारामतीच्या टी. सी. काॅलेजमध्ये जाऊन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून तरुण-तरुणींची राजकारण, सध्याच्या निवडणुका याबाबतची मते जाणून घेतली.

इथले तरुण तरुणी राजकारणाविषयी बोलतात. राजकारणाविषयी बोलत असताना ही तरुणाई राहुल गांधी, नरेंद्र मोदी या राष्ट्रीय नेत्यांबरोबर अरविंद केजरीवाल, मायावती, सचिन पायलट यांच्याविषयी बोलत आणि वाचत असते. प्रश्नांबाबत बोलायचे तर मोठ्या प्रमाणावर महिलांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत आणि सुटायला हवेत, असे तरुणींना आजही वाटते.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीकडून या दोन्ही पक्षांकडून महिला उमेदवार रिंगणात आहेत पण इथली तरुणाई आणि मुली या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाहीत. त्यांना त्यांच्या प्रश्नांची जाण असल्याचे जाणवते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com