#कारणराजकारण : बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन चे आव्हान

बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत मानली जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.
#कारणराजकारण : बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन चे आव्हान

बारामती :  बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत मानली जात आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीच्या नवनाथ पडळकर यांच्याकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांना पडणारी मते निर्णायक भूमिका बजावतील, अशी सध्या परिस्थिती आहे.

सुळे आणि कुल यांच्या लढतीत पडळकर यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असलं तरी मतदारसंघात धनगर समाजाची असलेली मोठी संख्या लक्षात घेता पडळकर यांचे महत्त्व वाढले आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काही प्रमाणात नेते प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्ग त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्यता आहे.

बारामती मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले असून याचा पडळकर यांना फायदा होईल असे चित्र आहे. मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या मोठ्या नेत्यांची मतदार संघात सभा झाली नाही तरी, आम्ही आमच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करु, असे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com