#कारणराजकारण - तर तुम्ही राजकारणातून संन्यास घेऊन दाखवा; कोल्हेंचे आढळरावांना आव्हान

आरोप खोटे असतील. तर , राजकारणातून संन्यास घेईन...असे शिवाजीराव आढळराव पाटील माझ्यावर माझ्या संपत्तीवरुन आरोप करत असताना म्हणाले होते. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रतीआव्हान दिले आहे. माझ्यावरचे आरोप चुकीचे असल्याचे पुरावे मी देतो, त्यानंतर आढळरावांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे डाॅ. कोल्हे म्हणाले.
#कारणराजकारण - तर तुम्ही राजकारणातून संन्यास घेऊन दाखवा; कोल्हेंचे आढळरावांना आव्हान

पुणे : आरोप खोटे असतील. तर , राजकारणातून संन्यास घेईन...असे शिवाजीराव आढळराव पाटील माझ्यावर माझ्या संपत्तीवरुन आरोप करत असताना म्हणाले होते. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रतीआव्हान दिले आहे. माझ्यावरचे आरोप चुकीचे असल्याचे पुरावे मी देतो, त्यानंतर आढळरावांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे डाॅ. कोल्हे म्हणाले.

सकाळ फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना डाॅ. कोल्हे म्हणाले, "शिरुर लोकसभा हा मतदारसंघ हा खूप नशिबवान आहे. या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची स्मृतिस्थळे आहेत. येथेनू विमानतळ दुसरीकडे जाणे हा आढळराव यांच्या अदूरदुष्टीपणाचा परिणाम आहे. विमानतळाबाबत आढळराव कमी पडले."

डाॅ. कोल्हे पुढे म्हणाले, "ससूनच्या रुग्णालयाच्या धर्तीवर हडपसर येथे रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. पुणे-नगर रस्त्यावर वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. पुणे- नाशिक मार्ग आणि रेल्वे मार्ग न होणे, बैलगाडा शर्यत बंद पडणे, हे आढळरावांचे अपयश आहे," स्वराज्य रक्षक मालिकेवर बोलतांना कोल्हे म्हणाले, "छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील मालिका कधीही  बंद  होणार नाही. मालिका आणि राजकारण हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com