कारणराजकारण - इंदापूरमधून आघाडीला किती मताधिक्य मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे

इंदापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे सध्या विद्यमान आमदार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत असं सांगितलं जात आहे.
कारणराजकारण - इंदापूरमधून आघाडीला किती मताधिक्य मिळेल हे पाहणे औत्सुक्याचे

इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे सध्या विद्यमान आमदार असून इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हेच पक्ष एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत असं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांमध्ये दिलजमाई झाली असून या वेळेस कार्यकर्तेही एकदिलाने काम करतील, असं सध्या सांगितलं जात आहे. मात्र असे सांगितले जात असलं तरी कार्यकर्ते कितपत एकदिलाने काम करतील याबाबत शंका वर्तवण्यात येत आहे.

त्याचबरोबर इंदापूर विधानसभा मतदारसंघात भाजप समर्थकांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला असून देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघावर स्वतंत्रपणे लक्ष घालून विकास कामांवर भर दिला असल्याचं इथल्या भाजप समर्थकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, वंचित बहुजन आघाडीचेचेही समर्थक या मतदारसंघात आहेत. ते संविधान, लोकशाही आदी मुद्द्यांवर तिथे बोलताना दिसून येतात.

दरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाट असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना 22 ते 24 हजार मतदान ची लिंक दिली होती यावेळी ते मताधिक्य किती टिकून राहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com