सहलीवरच्या खेड पंचायत समिती सदस्यांनी परत यावे

'माझी माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की, लोकांनी आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे;
IMG-20210614-WA0025.jpg
IMG-20210614-WA0025.jpg

पुणे : '.....या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या' अशी सादच जणू खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती व पंचायत समिती सदस्य अमोल पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना घातली आहे. सहलीवरच्या खेड पंचायत समिती सदस्यांनी परत यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

खेड पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती दालनामध्ये ते आज ( १४ जून ) पत्रकारांशी बोलत होते. या रिकाम्या धूळ बसलेल्या खुर्च्या दाखवण्यासाठी पत्रकारांना बोलाविले आहे, असे ते म्हणाले. जवळपास २१ दिवस म्हणजे तीन आठवडे, उपसभापतींसह ११ सदस्य राजकीय सहलीवर आहेत. तर सभापती न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रथमतः अविश्वास ठरावाच्या आधी ते सहलीवर होते. अविश्वास ठराव मंजूर झाल्यावर, नवीन सभापतींच्या निवडीपूर्वी जोखीम नको, म्हणून ते पुन्हा सहलीवर गेले. दरम्यान नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच उच्च न्यायालयाकडून त्याला स्थगिती आली. त्याबाबतची पुढची तारीख २५ जून आहे.

या साऱ्या घडामेाडीस अनुसरून पवार म्हणाले, 'आता आधीच २१ दिवस सदस्य बाहेर आहेत. न्यायालयाने २५ तारीख दिली आहे. तोपर्यंत बाहेर राहण्यापेक्षा, सदस्यांनी पंचायत समितीत यावे आणि लोकांच्या अडीअडचणी सोडवाव्यात. गेले अनेक दिवस या ठिकाणी सभापती आणि उपसभापती सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्या समस्या सोडवण्यासाठी हजर नाहीत, ही खेदाची व चिंताजनक बाब आहे. खरिपाच्या पूर्वतयारी चे दिवस आहेत. लोकांना अवजारे, खते व बियाणे यांच्या अडचणी येतात, त्या कोण सोडविणार? पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या नियोजनाबाबत समस्या आहेत. त्यामुळे लोकांची अडचण व अडवणूक होते.'

'माझी माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की, लोकांनी आपल्याला प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे; पळून जाण्यासाठी किंवा लपून बसण्यासाठी नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर राहील. न्यायालयीन प्रक्रिया पुढे किती दिवस चालेल माहित नाही. आधीच तुम्ही महिनाभर लोकांना वाऱ्यावर सोडले आहे. लोकांनी कामासाठी येथे कोणाला भेटायचे? म्हणून परत फिरा आणि लोकांमध्ये येऊन काम करा.' असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com