Lok Sabha Election : 'क्यूआर कोड' द्वारे मिळवा मतदान केंद्रासह सर्व महत्वाची माहिती; उपक्रमाचा श्री गणेशा!

QR Code Initiative : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये हा क्यूआर कोडची सुरुवात होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीने क्युआर कोडच्या मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार आहे.
QR Code
QR CodeSarkarnama

Pune Political News : राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) अशी लढत होणार आहे.

त्यामुळे हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघातील अधिकाधिक मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील विशेष काळजी घेतली जात आहे.

बारामती लोकसभा मतदार संघासाठी (Baramati Loksabha Constituency) उद्या मंगळवारी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक ते साहित्य पोहचविण्यात आले आहे.

ईव्हीएम मशीन (EVM Machine), मतदानासाठी आवश्यक असलेले कर्मचारी आणि त्यांना पुरवले जाणारे साहित्य याचे देखील वाटप जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्याचे काम सध्या सुरू आहे.

QR Code
Baramati Political News : मडकं फोडलं अन् रान पेटलं; बारामतीत नेमकं काय घडलं?

मतदान करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी मतदान केंद्रापर्यंत यावे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मतदान प्रक्रियेमध्ये नव्याने आलेल्या नव मतदारांना तसेच शहरी भागात स्थलांतर झालेल्या मतदारांना आपली मतदान केंद्र नक्की कुठे आहे, हे समजावे यासाठी क्यूआर कोडची (QR Code) सुविधा दिली जात आहे.

निवडणूक यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या मतदार चिठ्ठ्यांवर असे क्यूआर कोड प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये हा क्यूआर कोडची सुरुवात होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांमध्ये (Lok Sabha Constituency) अशा पद्धतीने क्युआर कोडच्या मतदार चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार आहे.

मतदारांना चिठ्ठ्यांचे वितरण करताना क्यूआर कोडसह वैयक्तिक माहितीच्या चिठ्ठ्या दिल्या जात आहेत. यामुळे नवमतदार तसेच नव्याने स्थलांतरित झालेल्या मतदारांना आपले मतदान केंद्र नेमके कोठे आहे, हे क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तातडीने समजणार आहे.

क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदार इपिक क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाइल क्रमांक यापैकी एकाची माहिती भरून एका क्लिकवर सर्व माहिती त्वरित समजणार आहे. असे जिल्हा प्रशासनातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

QR Code
BJP Leader Threat : भाजपच्या पुण्यातील नेत्याला धमकी; व्हिडिओ व्हायरल करत राजकीय करिअर संपवण्याचा दिला इशारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com