Rohit Pawar News : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 'बीसीसीआय'चे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि 'आयपीएल'चे चेअरमन अरुण धुमल यांची भेट घेतली आहे.
या भेटीदरम्यान त्यांनी 'बीसीसीआय'च्या सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक करत राज्यात होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट लीग स्पर्धेचं त्यांना निमंत्रण दिलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने राज्यात १५ ते २९ जून या दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट लीग (MPL) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचं निमंत्रण रोहित पवार यांनी रॉजर बिन्नी, जय शाह, राजीव शुक्ला आणि अरुण धुमल यांना दिलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कामाचं यावेळी त्यांनी कौतुक करत मनापासून सहकार्य करु, असा शब्द दिला असल्याचं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आज अहमदाबादमध्ये 'बीसीसीआय'ची विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत क्रिकेटसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. याचवेळी रोहित पवार यांनी 'बीसीसीआय'च्या अध्यक्षांसह जय शाह यांची भेट घेतली.
काय आहे रोहित पवार यांचं ट्विट?
'बीसीसीआय'चे सर्व पदाधिकारी क्रिकेटसाठी अत्यंत चांगलं काम करत आहेत. आज अहमदाबादमध्ये 'बीसीसीआय'ची विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये क्रिकेटसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने (MCA) राज्यात १५ ते २९ जून दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट लीग (MPL) स्पर्धेचं निमंत्रण 'बीसीसीआय'चे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि 'आयपीएल'चे चेअरमन अरुण धुमल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना दिलं.
या सर्वांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सुरु असलेल्या कामाचं कौतुक करत महाराष्ट्र क्रिकेट लीगला मनापासून सहकार्य करु, असं सांगितलं. त्यांच्या या भूमिकेचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.