Maharashtra Kesari News: महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी; प्रकरण पोलीस ठाण्यात पोचले

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
Maharashtra Kesari :
Maharashtra Kesari :
Published on
Updated on

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख हा विजयासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक होता. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा सिकंदर शेख यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा आपल्या नावे करणारच, असा विश्वास त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केला जात होता. पण उपांत्य फेरीतील त्याच्या पराभवाने त्याच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. त्याच्या या पराभवानंतरही चाहत्यांनी सोशल मीडियावर आयोजक आणि पंचांवर गंभीर आरोप केले आहेच.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांना धमकी देण्यात आली आहे. सिकंदर शेख (Sikandar Shaikh) विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरुन धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारुती सातव आणि संग्राम कांबळे यांचे फोन रेकॉर्डिग देखील व्हायरल झाले आहेत.

Maharashtra Kesari :
BJP News: जिल्हाध्यक्षांनीच केली भाजपची पंचाईत; संभाजी महाराजांचा उल्लेख 'स्वराज्यरक्षक' असा केला

संग्राम कांबळे यांनी सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांचा कुस्तीतील पंच मारुती सातव यांची फोनवरुन अक्षरश: झापलं आहे. कांबळे यांच्या धमकीनंतर पंच सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या तक्रारीचा अर्ज महाराष्ट्र केसरी स्पर्धा समितीच्या वतीने संदीप भोंडवे यांनी देखील कोथरूड पोलिसांकडे दिला आहे.

काय आहे प्रकरण?

सामना सुरु झाल्यावर सिकंदर आणि महेंद्र दोघांनीही सावध सुरुवात केली. सुरुवातील महेंद्रने पहिला डाव टाकत गुण मिळवला. त्यावर सिंकदरनेही खेळी दाखवत प्रतिडाव टाकला आणि २ गुण मिळवले. अशा प्रकारे सिकंदर २-१ ने पुढे गेला. यानंतर महेंद्रने पुन्हा एक डाव टाकला आणि ४ गुण मिळवले. महेंद्रने टाकलेला 'बाहेरची टांग' हा नावाचा डाव वादात सापडला. या डावावरुन सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. सिकंदकरच्या चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, महेंद्रने टाकलेला हा डाव चुकीचा होता. महेंद्रने लावलेली 'बाहेरील टांग' हा डाव नियमानुसार टाकला नाही. सिकंदर डेन्जर पोझिशनला नसताना त्याला ४ गुण का दिले? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

उपांत्य सामन्यात निर्णय बरोबर दिले असते तर , सिकंदरच विजयी झाला असता. यंदाचा खरा महाराष्ट्र केसरी फक्त सिकंदर शेखच आहे. पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज देशाच्या कुस्तीवर राज्य करणारा सिकंदर महाराष्ट्र केसरी होऊ शकला नाही.' अशी खंत त्याच्या चाहत्यांकडून व्यक्त केली जात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com