Swargate Multimodal Hub : पाच वर्षांत होणार स्वारगेटचा कायापालट : माधुरी मिसाळ

Madhuri Misal Election Campaign : स्वारगेटच्या जेधे चौकाचा कायापालट होईल; माधुरी मिसाळ यांना विश्वास
Madhuri Misal Election Campaign
Madhuri Misal Election Campaign
Published on
Updated on

पुणे : एसटी, पीएमपी, मेट्रो, रिक्षा, कॅबद्वारे कुठून कुठेही प्रवासासाठी एकाच ठिकाणाहून उत्तम कनेक्टिव्हिटी असणारा मल्टिमोडल हब प्रकल्प हा पुण्यासाठीच नव्हे तर देशासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून, त्यामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होईल असा विश्वास पर्वती मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ पर्वती दर्शन परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती शेंडगे, स्मिता वस्ते, रघुनाथ गौडा, अजय जगताप, राम गाडे, सुधीर कुरुमकर, श्रीकांत पुजारी, बाबुराव घाडगे, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, अविनाश गायकवाड, सदाभाऊ शिंगे, सुशील परदेशी, संतोष सावंत,आशुतोष शेडगे, नितीन लगस, देवेंद्र बनसोडे, बंटी मोकळ, बाळासाहेब शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिसाळ म्हणाल्या, या प्रकल्पामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे, उद्योग व्यवसाय बहरणार असून, तरुणांना रोजगार मिळणार आहेत. भुयारी स्वारगेट मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाले असून, जमिनीखाली पाच आणि जमिनीवर पाच मजले आहेत. या ठिकाणी मॉल-मल्टिप्लेक्स आणि इतर व्यवसायांसाठी जागा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे खरेदी आणि खाण्यापिण्याची उत्तम सोय होणार आहे.

मिसाळ पुढे म्हणाल्या, स्वारगेट कात्रज मार्गाचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात येश मिळविले. स्वारगेट ते कात्रज हा सुमारे 5 किलोमीटर 46 मीटर लांबीचा मेट्रो मार्ग असून, स्वारगेट, मार्केट यार्ड गुलटेकडी, पद्मावती, कात्रज या चार स्टेशनचा समावेश आहे. या प्रकल्पाला 2 हजार 494 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्याचे काम सुरू झाले असून पुढील पाच वर्षांत ते पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर सेवा मिळू शकेल. स्वारगेट एसटी स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला असून, लवकरच त्याचे काम सुरू होईल.

Madhuri Misal Election Campaign
IANS Opinion Poll : राज्यात मोठी उलाढाल! महायुती की 'मविआ' यंदा कुणाचं सरकार? मतदानापूर्वीचा पहिला सर्व्हे आला समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com