शरद पवार हे देशातील मोठे नेते, त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही : लांडगे

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेला भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांनी उत्तर दिले आहे.
Sharad Pawar, Mahesh Landge & Laxman Jagtap
Sharad Pawar, Mahesh Landge & Laxman Jagtap Sarkarnama

पिंपरी : भाजपच्या (BJP) पिंपरी-चिंचवड शहरातील दोन्ही आमदारांनी (चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे) शहराची पवना नदीच्या एका बाजूला मी व दुसरीकडे तू अशी वाटणी केली आहे. तसेच त्यांनी दुकानच मांडले नसून मॉलच उभे केल्याचा हल्लाबोल शनिवारी (ता.१६ ऑक्टोबर) शरद पवार (Sharad Pawar) यांनी जगताप (Laxman Jagtap) व लांडगे (Mahesh Landge) यांचे नाव न घेता केला होता. त्यावर दोन्ही आमदारांनी सावध भूमिका घेतली आहे.

Sharad Pawar, Mahesh Landge & Laxman Jagtap
पिंपरी-चिंचवडचा सेनापती कोण असणार? : खुद्द पवारांनी सांगितली दोनच नावे

भोसरीचे आमदार लांडगेंनी पंकजा मुंडेसारखी (Pankaja Munde) प्रतिक्रिया दिली. तर, जगताप यांनी यासंदर्भातील टीकेची बातमी वाचून उत्तर देईन, असे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. पवारसाहेब हे देशातील मोठे नेते असून त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, असे आमदार लांडगे म्हणाले. त्याचवेळी शहराच्या विकासाबाबत कुणाला शंका असेल, त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत,असे सांगत पवारांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे. दरम्यान, आजही पवार पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. रहाटणीमध्ये त्यांचा मेळावा सायंकाळी आहे. त्यात ते कालच्यासारखा आणखी काय हल्लाबोल व कुणावर करतात, याकडे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar, Mahesh Landge & Laxman Jagtap
राजीव गांधींनी माझ्याविरोधात सभा घेतली.. तरी मी जिंकलो : पवार रमले जुन्या आठवणीत!

पिंपरी-चिंचवडमधील माजी नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना पवार यांनी भाजप, केंद्र सरकार, राज्यातील नेते तसेच, पंकजा मुंडे आणि शहरातील दोन्ही आमदारांवर असा चौफेर हल्लाबोल केला होता. राज्य सरकार पडणार या भुमिकेतून बाहेर पडा, असा घरचा आहेर मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरून दसरा मेळाव्यात दिला होता. याबाबत विचारणा केली असता त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत,असे सांगून प्रश्नाला पवारांनी बगल दिली होती. दरम्यान, मुंडे यांनी आपल्यावरील पवारांच्या टीकेवर लगेचच मुंबईत पलटवार केला. शरद पवार माझ्यापेक्षा मोठे आहेतच. यात वाद नाही. पण, त्यांच्या बोलण्याने मी लहान होत नाही किंवा मोठीही होणार नाही, असा टोला लगावला होता.

तशीच काहीशी प्रतिक्रिया आमदार लांडगे यांनीही पवारांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेवर आज दिली. शरद पवार देशातील मोठे आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, असे लांडगे पवारांच्या टीकेवर बोलले. भाजपच्या माध्यमातून व देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघे शहर विकासासाठी कटिबद्ध आहोत. शरद पवारसाहेबांच्या टीकेला उत्तर देण्याइतका मी मोठा नाही. पण, भाजपच्या कार्यकाळाआधी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहराचा जेवढा विकास झाला नाही, तेवढा आम्ही दोघांनी मिळून गेल्या साडेचार वर्षात करून दाखवला आहे. त्याबाबत कोणाच्या मनात शंका असेल, तर त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी, त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत,असे म्हणत आमदार लांडगे यांनी एकप्रकारे आव्हानाचीच भाषा केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com