पुणे जिल्ह्यात माळेगाव व पारगाव दोन नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार...

Pune Police| Latest news update| राज्यशासनाच्या राजपत्रात या बाबत घोषणा करण्यात आली आहे.
Pune Police|
Pune Police|

मिलिंद संगई

बारामती: पुणे जिल्ह्यातील पोलिसांच्या कामकाजावरचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्याच्या गृह विभागाने माळेगाव व पारगाव या दोन नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी प्रारंभ केला आहे. राज्यशासनाच्या राजपत्रात या बाबत घोषणा करण्यात आली आहे. त्या मुळे आगामी काही महिन्यात नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती होणार आहे.

विद्यमान पोलीस ठाण्यांवर असलेला कार्यभार कमी करणे व पोलिसांचे कामकाज अधिक प्रभावी करणे या उद्देशाने राज्याच्या गृह विभागाने माळेगाव व पारगाव या दोन नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीसाठी मान्यता दिली होती. आता लवकरच या ठाण्याची निर्मिती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pune Police|
आता माघार नाही! लष्कराने आंदोलकांना इशारा देत केली महत्वाची घोषणा

नवीन रचनेनुसार बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उंडवडी कडे पठार, गोजुबावी, जराडवाडी, बऱ्हाणपूर, शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, कटफळ, पारवडी, निंबोडी, जैनकवाडी, काटेवाडी, कन्हेरी, सावळ, ढेकळवाडी, सोनगाव, झारगडवाडी, मेखळी, सावंतवाडी, रुई, तांदुळवाडी, वंजारवाडी पोलीस ठाणे यांचा समावेश असेल.

तर नव्याने होणाऱ्या माळेगाव पोलीस ठाणे अंतर्गत माळेगाव बुद्रुक, माळेगाव खुर्द, सांगवी, शिरवली, खांडज, पाहुणेवाडी, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, अंजनगाव, कऱ्हावागज, भिलारवाडी, नीरावागज, घाडगेवाडी, येळेवस्ती, कांबळेश्वर, ढाकाळे, मानाप्पावस्ती, धुमाळवाडी, पवईमाळ, सोनकसवाडी, नेपतवळण व मेडद या गावांचा समावेश होणार आहे.

वडगावनिंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव निंबाळकर, को-हाळे बुद्रुक, को-हाळे खुर्द, थोपटेवाडी, होळ, सदोबाचीवाडी, सस्तेवाडी, लोणीभापकर, पळशी, वाकी, चोपडज, मुढाळे, सायंबाची वाडी, मासाळवाडी, करंजे, निंबूत, मुर्टी, मोढवे, मुरुम, खंडोबाची वाडी, गडदरवाडी, वाघळवाडी, सोरटेवाडी, मगरवाडी, जोगवडी, चौधरवाडी, वाणेवाडी, मोराळवाडी, करंजेपूल, लाटे, माळवाडी, लाटे, कुरणेवाडी, पांढरवाडी, पिंगळेवस्ती, बजरंगवाडी, खामगळवाडी, शिरष्णे ही गावे असतील.

Pune Police|
संघाच्या कार्यकर्त्याने साखर कारखाना चालवला, याचे मोठे समाधान : गडकरी

माळेगाव पोलिस ठाण्याच्या निर्मितीमुळे बारामती तालुका पोलीस ठाणे वरील कार्यभार कमी होणार असून अधिक प्रभावी पद्धतीने पोलिसांचे कामकाज होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आता देहुगाव, देहुरोड, किवळे, विकासनगर, मामुर्डी, तळवडे, किन्हई, चिंचोली ही गावे तर रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीत रावेत, निगडी सेक्टर 26, किवळे, पुनावळे, पुनावळे माळवाडी ही गावे असतील.

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत तळेगाव टाऊन, तळेगाव स्टेशन, सोमाटणे फाटा, शेलारवाडी, गहुंजे, ओझर्डे गावठाण, शिरगाव (खळवाडी- एक्स्प्रेस हायवेची डावी बाजू). शिरगाव परंदवडी पोलिस ठाणे- आढे, उसे, परंदवाडी, धामणे, बेबड ओहोळ, चांदखेड, आढले खुर्द, आढले बुद्रुक, पुसाणे, पाचाणे, कुसगाव पमा, सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे, साळुंब्रे, गहुंजे गावठाण, सोमाटणे गावठाण, ओझर्डे (ओझरकर वस्ती, शेळकेवाडी, पारखेवस्ती), शिरगाव गावठाण (खळवाडी एक्सप्रेस हायवेची उजवी बाजू)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com