sar70.jpg
sar70.jpg

मिलींद तेलतुंबडे मला जंगलात भेटले : शरणागत नक्षलवादी कृष्णाची कबुली

शहरी भागात माओवादी चळवळ पसरविण्याचे काम अरुण व त्याची पत्नी कांचन करीत,

पुणे : माओवादी नेता दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे आणि अरूण भेलके यांच्याशी माझी जंगलात भेट झाली. चळवळीच्या कामाबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली. हे दोघेही या चळवळीत सक्रिय होते. शहरी भागात माओवादी चळवळ पसरविण्याचे काम अरुण व त्याची पत्नी कांचन करीत, अशी साक्ष शरणागती पत्करलेल्या नक्षलवादी कृष्णा दोरपटे याने बुधवारी पुणे न्यायालयासमोर दिली.


दोरपटे हा गडचिरोली येथील शरणागत नक्षलवादी आहे. माओवादाच्या गुन्ह्यात अटक अरुण भेलके प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्यासमोर त्याची साक्ष झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वला पवार यांनी कृष्णाची तपासणी घेतली. मी नक्षल दलामध्ये सक्रिय असताना जंगलात दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेची भेट झाली. तेव्हा त्यासोबत शहरी भागात काम करणारे जानकी, समर व अन्य काही जण सोबत होते, असेही कृष्णाने न्यायालयात सांगितले. दरम्यान, अरूणचे वकील रोहन नहार यांनी उलट तपासणी घेतली. कृष्णा व आरोपीची भेट झालेली नाही. कृष्णा हा शरणागत नक्षलवादी असल्याने सरकारकडून मदत मिळेल या आशेने पोलिसांनी सांगितल्यानुसार जबानी देत आहे. अरुण याचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. पत्नीच्या आजारपणामुळे तो २०११ पासून पुणे- मुंबई या ठिकाणी राहत आहे. त्याच्यावर पूर्वीचे प्रलंबीत गुन्हे असल्यामुळे तो नाव बदलून राहत आहे. त्यामुळे त्याचा या गुन्ह्याशी संबंध आहे हे म्हणणे चुकीचे आहे, असा युक्तिवाद ॲड. नहार यांनी केला. त्याने कोणताही गुन्हा केला नसल्याचे व नक्षलवादी चळवळीत तो कार्यरत नसल्याचे नहार यांनी न्यायालयाला सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.

कांचनच्या वस्तू अरुणला देण्याची मागणी
अरूणची पत्नी कांचनचा नुकताच मृत्यू झाला आहे. तिच्या वस्तू व त्यांनी लिहिलेली पत्रे, तिने कारागृहात केलेले लिखाण कारागृह प्रशासनाने त्यांच्याकडे आहे. ते मिळण्याचा अधिकार अरुणला आहे. परंतु, कारागृह कांचनच्या वस्तू अरुणला द्यायला विरोध करत आहे. त्यामुळे न्यायालयाने त्या वस्तू अरुणला देण्यासंबंधी आदेश करावेत, अशी मागणी ॲड. नहार यांनी न्यायालयाकडे केली.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com