सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांसोबत राष्ट्रवादीचे आमदार भरणेंचा विमानप्रवास

भाजप नेत्यांसोबत राष्ट्रवादीचे आमदार इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी प्रवास केल्याने तो चर्चेचा विषय झाला.
सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांसोबत राष्ट्रवादीचे आमदार भरणेंचा विमानप्रवास

पुणे : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याासोबत एकाच विमानाने राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे मुंबईहून पुण्याला आले आणि त्यांच्याच गाडीतून पुढे कौन्सिल हाॅल येथे बैठकीसाठी गेले. पश्चिम महाराष्ट्रात काॅंग्रेस-राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यात यशस्वी असलेले चंद्रकांतदादांसोबत भरणेंनी एवढी गट्टी जमविल्याने साहजिकच तो चर्चेचा विषय झाला.

ही चर्चा व्हायला कारणही तसेच आहे. काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपात इंदापूरचा मतदारसंघ कोणाकडे जाणार, याचा तिढा उभा राहणार आहे. काॅंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या मतदारसंघासाठी आधीपासून आग्रह धरला आहे. तर दुसरीकडे विद्यमान आमदाराची जागा राष्ट्रवादी सोडण्यास तयार नाही. या जागावाटपावरून दोन्ही पक्षांत आतापासूनच रस्सीखेच आहे.

ज्या पक्षाला इंदापूरची जागा मिळेल त्या विरोधात दुसऱया पक्षाचा नेता हा भाजपकडे जाणार, असा तालुक्यात आतापासूनच अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळेच भरणे यांचे भाजपच्या नेत्यांशी सलगी असणे चर्चेच बनले आहे.

स्वतः भरणे यांनी मात्र या प्रवासात राजकीय चर्चा झाल्याचा इन्कार केला. ते म्हणाले की मुंबईत विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होती. ती बैठक संपवून मला पुण्याला अर्थमंत्र्यांच्याच बैठकीला यायचे होते. अर्थमंत्री आणि महसूलमंत्री दोघेही स्वतंत्र विमानाने पुण्यात येणार होते. या विमानाता जागा असल्याचे कळाल्यानंतर मी त्यांच्यासोबत आलो, असे भरणे यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com