पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला हवीत तीन मंत्रीपदे; कॉंग्रेसला एकतरी मिळणार का ?

गेल्या तीन टर्म संग्राम थोपटे हे भोरचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळी त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
SANGRAM-THOPTE MLA Aiming for Ministerial berth
SANGRAM-THOPTE MLA Aiming for Ministerial berth

पुणे : तीन आमदारामागे एक मंत्रीपद या सूत्राप्रमाणे पुणे जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळायला हवीत, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दहा आमदार आहेत. कॉंग्रेसचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या या सूत्रानुसार कॉंग्रेसचा जिल्ह्यातून एकतरी मंत्री होणार का ? अशी चर्चा कॉंग्रेसचे कार्यकर्ते करू लागले आहेत.

नागपूर अधिवेशनानंतर मंत्रीमंडळाच्या विस्तार अपेक्षित आहे. या विस्तारात पुणे जिल्ह्यातून कॉंग्रेसच्यावतीने आमदार संग्राम थोपटे यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे. थोपटे यांना मंत्रीपद मिळाले तर त्यांच्या रूपाने 1992 नंतर तालुक्‍याला प्रथमच मंत्रीपद मिळणार आहे.


1992 साली राज्यात सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार होते. मुंबईत झालेल्या दंगलीनंतर नाईक यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांना दिल्लीतून पाचारण करण्यात आले. दुग्धविकास मंत्री असलेल्या थोपटे यांना पवार यांच्या मंत्रीमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर झालेल्या 1995 निवडणुकीत थोपटे पुन्हा आमदार झाले. मात्र, राज्यात युतीची सत्ता आली. 


1999 च्या निवडणुकीत कॉंग्रेची सत्ता आली. मात्र, या निवडणुकीत थोपटे यांचा काशिनाथ खुटवड यांच्याकडून अनपेक्षित पराभव झाला. या निवडणुकीत थोपटे विजयी झाले असते तर  त्यांना फार मोठी   संधी होती.  ज्येष्ठ आणि निष्ठावान कॉंग्रेस नेता म्हणून सोनिया गांधींकडे थोपटे यांचे वजन होते. थोपटे मुख्यमंत्री होतील, असे  त्या काळात त्यांचे समर्थक म्हणत  होते. मात्र, निवडणुकीत पराभव झाल्याने ते स्वप्नच राहिले. 


थोपटे यांच्या पराभवामुळे विलासराव देशमुख यांना पहिल्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. 2004 च्या निवडणुकीत अनंतराव थोपटे पुन्हा निवडून आले. मात्र, पुन्हा मंत्री वा मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळाली नाही. 2009 च्या निवडणुकीत उभे न राहता राजकारणातून निवृत्ती घेत चिरंजीव संग्राम थोपटे यांना उमेदवारी दिली. 


गेल्या तीन टर्म संग्राम थोपटे हे भोरचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळी त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातून कॉंग्रेसचे दोन आमदार निवडून आले आहेत. भोरमधून संग्राम थोपटे तर पुरंदरमधून संजय जगताप यांचा समावेश आहे. जगताप पहिलांदाच निवडून आले आहेत. थोपटे यांची ही तिसरी टर्म आहे. कॉंग्रेसचे दोनच आमदार असल्याने पुणे जिल्ह्यातून थोपटे यांना संधी मिळण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com