'मनसे'नं गमावले नाना पाटेकरांचे मत

पुणे : "त्यांचं काही नुकसान झालं नाही. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत गेले,'' असे म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी "मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.
'मनसे'नं गमावले नाना पाटेकरांचे मत

पुणे : "त्यांचं काही नुकसान झालं नाही. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत गेले,'' असे म्हणत अभिनेते नाना पाटेकर यांनी "मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 133व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला उपस्थित राहण्यासाठी नाना पाटेकर आज येथे आले होते. एल्फिस्टीन स्थानकावरील दुर्घटनेनंतर 'मनसे'ने फेरीवाल्यांविरोधात जोरदार आंदोलन पुकारले होते. याचा धागा पकडून पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या खास 'ठाकरे शैलीत' पाटेकर यांचा समाचार घेतला होता. "मराठी चित्रपटांवर बंदी घातली असताना नाना पाटेकर का बोलत नाहीत,'' असा सवालही त्यांनी विचारला होता.

या बाबत पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना पाटेकर म्हणाले, "प्रत्येकाला जे वाटते ते मांडण्याचा अधिकारी आहे. ते त्यांनी मांडले. कोणी काय बोलायचे हे मी कसं ठरवणार? यातून त्यांचं काही नुकसान झालं नाही. फक्त त्यांचे एक मत गेलं. मनसेचे फक्त एक मत गेलं.'' फेरीवाल्यांची जागा एकदा ठरवा. नको त्या जागेवर बसले की मग लाव त्यांना हुसकावून,'' असेही त्यांनी सांगितले.

'एनडीए' महाराष्ट्रात आहे, पण 'एनडीए' महाराष्ट्रातील मुले दिसत नाहीत, यावर बोलताना पाटेकर म्हणाले, "येथे असलेला प्रत्येक जवान, अधिकारी याच्यावर विश्‍वास ठेवा. देशाच्या समस्या फक्त सिमेवर नाहीत, तर अंतर्गतही आहेत. आपण आपापसांत लढत आहोत. राजकारणी आपल्याला आपापसांत लढवत आहेत. आपलं डोकं गहाण ठेवून आपण एकमेकांना मारत आहोत, हे बंद झालं पाहिजे,''
 
पद्मावती चित्रपटावरून धमक्‍या देणे चुकीचे
पद्मावती चित्रपटावरून दिग्दर्शकाला धमक्‍या देणे, त्यांना मारण्याची, नाक कापण्याची केली जाणारी भाषा योग्य नाही. त्याचे समर्थन करता येणार नाही. असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले. तो चित्रपट पाहिल्याशिवाय त्या बद्दल बोलता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बाजीराव-मस्तानी चित्रपटात बाजीरावची भूमिका ज्या पद्धतीने दाखविली आहे, ते बघून मला असं वाटत नाही की बाजीराव तसे असतील. ते असं गाणं म्हणणार नाहीत, असेही नाना म्हणाले.
 
"संघटनांना आंदोलन करण्याची संधी मिळू न देणे ही काळजी चित्रपट करताना घेतली पाहिजे. वाद का होतात? माझ्या चित्रपटाबद्दल कधी वाद झाला नाही. क्रांतिवीर चित्रपटात तर अशी वाक्‍ये होती की प्रत्येकाला राग आला पाहिजे होता. पण, ते जर योग्य पद्धतीने दाखविले तर, लोकांना कळते की चांगले काय आणि वाईट काय.'' असे नाना यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com