दौंडमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी रमेश थोरात यांना निश्चित : हल्लाबोलच्या सभेतच केली घोषणा

दौंडमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी रमेश थोरात यांना निश्चित : हल्लाबोलच्या सभेतच केली घोषणा

केडगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 2019 विधानसभा निवडणुकीत माजी आमदार रमेश थोरात यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे सांगत थोरात यांची उमेदवारी आज निश्चित केली. थोरात हे दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असल्याने ही निवड अपेक्षेप्रमाणे झाली. तरी या घोषणेमुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असणा-यांचे काय हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 

वरवंड ( ता.दौंड ) येथे राष्ट्रवादी काँग्रेसने हल्ला बोल सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या निमित्ताने रमेश थोरात यांना प्रोजेक्ट करण्यात आले होते. थोरात यांनी जातीने लक्ष घालून हा सभा यशस्वी करून दाखविली. कडक उन्हातही सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. सभेला उपस्थित राहण्यासाठी थोरात व त्यांच्या सहकार्यांनी कंबर कसली होती. स्वतः थोरात एका गावात तीन तीन वेळा जाऊन लोकांना सभेला येण्याचे आवाहन करीत होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने थोरात यांनी मोठी तयारी या सभेच्या निमित्ताने केली आहे. 

व्यासपीठावर थोरात हे अजित पवार यांच्या शेजारी केंद्रस्थानी बसले होते. यावरून संपूर्ण सभा थोरात यांच्या भोवती फिरत असल्याचे दिसत असतानाच तटकरे यांनी थोरात यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. यामुळे थोरात समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दौंड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार व माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे इच्छुक होते. मात्र तेव्हाही अपेक्षेप्रमाणे थोरात यांना उमेदवारी मिळाली. यावेळी इच्छुक असणा-यांना आता आणखी पाच वर्षाची वाट पहावी लागणार आहे. रमेश थोरात यांचे पुत्र गणेश थोरात हे सुद्धा अधूनमधून भावी आमदार म्हणून सोशल मिडीयावर झळकत असतात.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com