भाजपला आयते मिळालेले दादा, भाऊ मोठ्या निविदांतच मश्गूल!

राष्ट्रवादीचे (NCP) संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.
Laxman Jagtap, Sanjog Waghere & Mahesh Landge

Laxman Jagtap, Sanjog Waghere & Mahesh Landge

Sarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी (PCNTDA) जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याचा प्रश्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) लटकावला असल्याची टीका चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी सोमवारी (ता.20 डिसेंबर) डागली होती. तिचा समाचार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere) यांनी लगेच मंगळवारी (ता.21 डिसेंबर) घेतला. वीस वर्षे आमदार असताना यांना प्राधिकरण बाधितांच्या परताव्याचा प्रश्न सोडवता आला नाही, असा हल्लाबोल त्यांनी जगतापांवर केला.

<div class="paragraphs"><p>Laxman Jagtap, Sanjog Waghere &amp; Mahesh Landge</p></div>
दिवसाढवळ्या गोळीबार करणाऱ्या खूनातील आरोपींना दोन दिवसात बेड्या..

पिंपरी-चिंचवड पालिका निवडणूक (PCMC Election-2022) तोंडावर आल्याने भाजपचे शहरातील दोन्ही आमदार ((भोसरीचे महेशदादा लांडगे व चिंचवडचे लक्ष्मणभाऊ जगताप) सक्रीयता दाखविण्यासाठी पत्रकबाजी करत आहेत. परंतू, प्रसिध्दीच्या मोहापायी भाजपचे हे 'भाऊ-दादा' आपल्याच अपयशाची कबुली जाहीरपणे देत आहेत, असा पलटवार वाघेरेंनी केला.

वाघेरे म्हणाले, भाजपला आयते मिळालेले हे दोन्ही भाऊ-दादा निवडणुका आल्या की शहरवासीयांची आणि मतदारांची दिशाभूल करतात. केवळ निवडणुकीच्या वेळी लोकांचे आणि शहराचे प्रश्न आठवतात. इतर वेळी मोठ मोठ्या निविदा काढण्यात ते मश्गूल असतात. महापालिकेत पाच वर्षे भाजपचे पाशवी बहुमत आहे. मात्र, त्यांच्या नगरसेवकांना बोलण्याचा देखील अधिकार नाही. आमदारांच्या सांगण्यावरून सगळ्या निविदा आणि कामे होत आहेत. ते सांगतील तेच नगरसेवक बोलतात. जे नगरसेवक भाजपच्या चुकीच्या गोष्टीवर खरं बोलतात. त्यांच्यावर अन्याय केला जातो. नगरसेवकाची भूमिका पत्रकबाजी आणि कामात हस्तक्षेप करून आमदार बजावत आहेत, असा टोला देखील वाघेरेंनी लगावला.

<div class="paragraphs"><p>Laxman Jagtap, Sanjog Waghere &amp; Mahesh Landge</p></div>
साडेबारा टक्के परताव्यासाठी चाळीस वर्षापासून सरकार जमीनच शोधतंय..

भाजपच्या चिंचवडच्या आमदारांनी प्राधिकरण बाधितांचा परताव्याचा प्रश्न उपस्थित करत त्यांचे खापर राज्यातील सध्याच्या सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला. मुळात हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे ते सांगत आहेत. ते एक वेळा विधानपरिषदेचे आणि तीन वेळा विधानसभेचे आमदार आहेत. राज्यात भाजप सत्तेत असतानाही ते आमदार होते. त्यांना आमदार आणि सत्तेत असताना हा प्रश्न निकाली काढता आला नाही. आता त्याचे भांडवल करून इतरांना बदनाम करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी सणसणीत चपराक वाघेरेंनी जगतापांना लगावली. महापालिका कर्मचा-यांसाठी राष्ट्रवादीने धन्वंतरी स्वास्थ योजना लागू केली होती. ती भाजपच्या कार्यकाळात बंद करून विमा योजना लागू करून टक्केवारी लाटण्याचा डाव ज्यांनी आखला, तेच दिशाभूल करण्यासाठी दिखावा करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com