गजा मारणे तळोजातून सुटला आता पुणे पोलिस कारवाई करणार का?

Gaja Marane| Crime news | पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची नागपुरच्या कारागृहातून सुटका झाली आहे.
Gaja Marane
Gaja Marane
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marane)याची नागपुरच्या कारागृहातून सुटका (Released) झाली आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गजा मारणेने मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रॅली काढल्याप्रकरणी त्याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. विघातक कृत्यास आळा घालणे या कायद्यांतर्गत (Maharashtra Prohibition of Dangerous Activity) गजा मारणेला एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आलं होतं. वर्षभरानंतर गजा मारणेची तुरुंगातून सुटका झाली आहे. (Pune Crime news latest update)

पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या गजा उर्फ गजानन मारणे याची पुण्यात चांगलीच दहशत आहे. त्याच्याविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दाखल झाले आहेत. 2014 मध्ये केलेल्या दोन हत्या प्रकरणात गजा मारणे गेल्या सात वर्षांपासून तळोजा कारागृहात शिक्षा भोगत होता. गेल्या वर्षी या हत्यांच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याच्या साथीदारांनी तळोजा जेल ते पुणे अशी 300 गाड्यांसह त्याची मिरवणूक काढली. इतकेच नव्हे तर उर्से टोल नाक्यावर फटाके फोडत गोंंधळ घालत या प्रकाराचे ड्रोन शूटही केले. याच मिरवणुकीमुळे गजा मारणेला पुन्हा तुरुंगवारी करावी लागली.

Gaja Marane
गुंड गजा मारणे आला आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून निघून गेला

आज तब्बल 8 वर्षानंतर गजा मारणे तुरुंगातून बाहेर आला आहे. गजा मारणेच्या मिरवणूकीत सहभागी झालेल्या बहुतांश गुंडावर पुणे पोलिसांनी आधीच कारवाई केली आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस गजा मारणेवर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मिरवणूक काढणे, उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे, फूड मॉलमधील वस्तू जबरदस्तीने उचलणे या प्रकरणी गजासह त्याच्या 150 साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गजा मारणे फरार झाला होता. पोलिसांना गुंगारा देऊन मारणे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात लपून बसला होता. अखेर 6 मार्च 2021 रोजी साताऱ्यातील जावळी तालुक्यातून गजाला अटक करण्यात आली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरानंतर आता नागपूर कारागृहातून त्याची सुटका झाली आहे.

गजा मारणेसह त्याच्या 150 साथीदारांवर विविध गुन्हा दाखल करण्यात आले होते.पोलिसांच्या हाती तुरी अनेक दिवस तो फरारही होता. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात लपून बसला होता. 6 मार्च 2021 रोजी साताऱ्यातील जावळी तालुक्यातून पोलिसांननी गजाला अटक केली. विघातक कृत्यांप्रकरणी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याने एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर वर्षभरानंतर गजा मारणेची नागपूर कारागृहातून सुटका झाली आहे.

काय आहे एमपीडीए कायदा? महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कृत्यांचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी) होय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com