पुण्यासह सात जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट'

पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर,ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नगिरी या जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाच्या मुसळधार सरी पडतील.
pune rain1.jpg
pune rain1.jpg

पुणे : पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर,ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नगिरी या जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाच्या मुसळधार सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.'(Orange alert' for rains in seven districts including Pune) 

कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी येत्या सोमवारी (ता. 13) पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे कायम असून, राजस्थान मधील कमी दाब क्षेत्रापासून गुजरात, शाजापूर, संभाळपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. तर अरबी समुद्रापासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत ते ठळक कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. 

कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढली
राजस्थान आणि गुजरात परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, त्याचे अतितीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. ही प्रणाली राज्यात पाऊस वाढण्यास पोषक ठरणार आहे, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले.
कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर कोकण, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र विदर्भात विजा, गडगडाटासह पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. 

.............
मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) 
कोकण : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी. 
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर. 
..........
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) 
कोकण : सिंधुदुर्ग, मुंबई. 
मध्य महाराष्ट्र : नाशिक. 
मराठवाडा : जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड. 
विदर्भ : नागपूर, भंडारा, चंद्रपूर. 
.............
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव. 
विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com