पुण्याच्या काँग्रेसमधली सुंदोपसुंदी वाढली : अमित बागूल राजिनामा देण्याचा मनःस्थितीत

पर्वती मतदारसंघातील आज होणाऱ्या मेळाव्यासाठी विश्‍वासात घेतले गेले नाही, मेळाव्याचे निरोप ड्रायव्हरमार्फत देण्यात येतात. शहर पातळीवरील नेते म्हणवणाऱ्यांची सारी मनमानी सुरू आहे, असे आरोप करीत पक्षाचे शहर सरचिटणीस व शहर युवक काँग्रेस माजी उपाध्यक्ष अमित बागूल यांनी मेळाव्यातच पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. माझ्यासोबत सुमारे दोनशे पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामे देतील, असा दावा बागूल यांनी केला आहे.
पुण्याच्या काँग्रेसमधली सुंदोपसुंदी वाढली : अमित बागूल राजिनामा देण्याचा मनःस्थितीत

पुणे : पर्वती मतदारसंघातील आज होणाऱ्या मेळाव्यासाठी विश्‍वासात घेतले गेले नाही, मेळाव्याचे निरोप ड्रायव्हरमार्फत देण्यात येतात. शहर पातळीवरील नेते म्हणवणाऱ्यांची सारी मनमानी सुरू आहे, असे आरोप करीत पक्षाचे शहर सरचिटणीस व शहर युवक काँग्रेस माजी उपाध्यक्ष अमित बागूल यांनी मेळाव्यातच पक्षाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. माझ्यासोबत सुमारे दोनशे पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामे देतील, असा दावा बागूल यांनी केला आहे. 

शहर काँग्रेस आधीच विविध गट आणि उपगटात विभागली आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षातील तरूण कार्यकर्त्यांचे हे बंड पक्षाच्या दृष्टीने अडचणीचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सध्या विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यांचा भाग म्हणून आज पर्वती मतदारसंघाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचे नियोजन शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. या मेळाव्याच्या नियोजनाचे सोडा साधे निमंत्रण देण्याची तसदीदेखील संयोजकांनी घेतली नाही. ड्रायव्हरमार्फत निमंत्रण देण्यात येत आहे, असे बागूल यांनी सांगितले. अमित हे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांचे चिरंजीव आहेत. गेली सुमारे वीस वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. 

चार दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेन्ट विधासभा मतदारसांचा मेळावा झाला. या मेळाव्यातील सहभागाबाबतही काही ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी मंत्री वसंत पुरके व हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी काही जणांना बोलण्याची संधी दिली गेली नाही, अशी तक्रार आहे. एका बाजूला शहराध्यक्ष रमेश बागवे निवडणुकांची तयारी करण्यासाठी मेळावे घेत आहेत. मात्र दुसरीकडे यातून अंतर्गत गटबाजी व नाराजी वाढत आहे. विशिष्ट लोकांनी या मेळाव्यांच्या नियोजनावर ताबा मिळविला आहे. इतरांना सहभागी करून घेण्यात येत नाही, असा आरोप करण्यात येत आहे. पक्षातील नाराजी कमी करून सर्वांना एकत्र आणण्याचे काम करण्याची गरज आहे. मात्र ते न होता. पक्षातील गटा-तटांची दरी वाढत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com