गिरीश बापटांनी पाजले "यमराजा'ला दूध ! 

गिरीश बापटांनी पाजले "यमराजा'ला दूध ! 

पुणे : सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दारू ऐवजी दूध प्या, असे आवाहन सामाजिक संस्था करतातच. परंतु पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन यमराजालाचा "दूध पाजून दारू नको दूध प्या' असे जाहीर आवाहन केले. 

यमराजही आता दारू प्यायचा नाही, तर दूधच पसंत करेल, अशी टिप्पणी यावेळी कार्यकर्त्यांनी जोडली. तेव्हा पालकमंत्र्यासह साऱ्यांनीच हास्य विनोदात 31 डिसेंबर आनंदोत्सवात साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले. 

पुण्यात गोपाळ कृष्ण गोखले चौकात आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे दारू नको, दूध प्या हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला पालकमंत्र्यांना देखील आमंत्रित केले होते. पालकमंत्री बापट येताच यमराजाच्या भूमिकेतील कलाकार पुढे झाला. पालकमंत्र्यांच्या हातात दूधाचा पेला देण्यात आला आणि नागरिकांना दूधाचे वाटप करावे.अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. मात्र पालकमंत्र्यांनी दूधाचा पेला यमराजाच्या भूमिकेतील कलाकाराच्या तोंडाला लावला आणि दारू नको दूध प्या, असे आवाहन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com