पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा-महाविद्यालयांचे पुनश्चः हरी ओम!

Ajit Pawar | Pune | Colleges | covid Restriction :
Colleges
Colleges sarkarnama

पुणे : पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा महाविद्यालय पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. आज पुणे - पिंपरी चिंचवड शहराची कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, काही निर्बंधांसह शाळा आणि महाविद्यालय आपण सुरू करत आहोत. यात नववी पासून पुढचे सर्व वर्ग पूर्णवेळ भरणार आहेत. तर पहिली ते आठवीचे वर्ग केवळ ४ तासच भरणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, सरकारला प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत उपस्थिती बंधनकारक राहणार नाही. तसेच मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती गरजेची आहे. आम्ही सगळे शाळेत नियम पाळणार आहोत. मात्र खबरदारी म्हणून पहिली ते आठवीच्या मुलांनी शाळेत डबा न्यायचाच नाही. पुढच्या आठवड्यात परिस्थिती पाहून अजून निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळा सुरु झाल्यानंतर नववी पासूनच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच करण्यात येणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात मास्क बंधनकारक!

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून मास्क हटणार असल्याच्या चर्चा दिसून आल्या. त्याबाबतच्या बातम्या देखील काही माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील याबाबतची चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र या सर्व बातम्या आणि चर्चा धादांत खोट्या आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत देखील अशी कोणतीही चर्चा झालेली नसून महाराष्ट्रात अद्याप मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, वेगवेगळ्या चॅनेल्सनी महाराष्ट्रात मास्क बंधनकारक असल्याच्या बातम्या दाखवल्या, मात्र माध्यमांना माझी विनंती आहे की, नीट माहिती घेवून बातम्या चालवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमचे सगळ्यांचे देखील मास्क वापरलाच पाहिजे असे मत आहे. बाहेरच्या देशांमध्ये इंग्लंड वगैरे अशा देशांमध्ये निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचा निर्णय त्यांना लखलाभ. महाराष्ट्रात तशा पद्धतीची चर्चा देखील नाही आणि तसा कोणता निर्णय देखील नाही. लोकांमध्ये उगीच गैरसमज पसरवू नये असे माझे सांगणे असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच तिसरी लाट तुलनेने खूप सौम्य राहिली, याबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com