आमदार लांडगेंवर आरोप करत दुसऱ्या लांडगेंचा भाजपला रामराम

रवी लांडगे आणि महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्या वाद काय?
Mahesh Landage, Ravi Landage
Mahesh Landage, Ravi Landagesarkarnama

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) पक्षाला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी रविवारी (ता.६) शहरात येत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला बिनविरोध निवडून आलेले भाजपचे निष्ठावंत नगरसेवक रवी लांडगे (Ravi Landage) यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने शहरात व त्यातही भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही गळती फडणवीस कशी रोखणार ही चिंता शहरातील पक्षाच्या कारभाऱ्यांना भेडसावू लागली आहे. दरम्यान, निष्ठावंत अशा जुन्या भाजपाईनेच आता पक्षाला रामराम केल्याने हा भाजपला बसलेला जोरदार धक्का त्यांना अंतर्मुख करायला लावणाराही आहे.

भाजपला (Bjp) शहरात नावलौकीक करून देणारे आणि भोसरी हा पक्षाचा बालेकिल्ला केलेले पक्षाचे स्वर्गीय अध्यक्ष अंकुश लांडगे यांचे रवी हे सख्खे पुतणे आहेत. युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. गतवेळी २०१७ ला ते भोसरीतील ६ ब प्रभागातून बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पाठवून दिला. त्यात त्यांनी शहर कारभारी भोसरीचे भाजप आमदार आणी शहराध्यक्ष महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्यावर खळबळजनक व गंभीर आरोप केले आहेत. भाजपला भ्रष्टाचाराची देणगी आमदार लांडगे यांनी दिली असून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाची प्रतिमा भ्रष्टाचारी पक्ष अशी झाली आहे, अशी तोफ त्यांनी त्यात डागली आहे. रवी लांडगे यांनी केलेल्या आरोपांबाबत आमदार महेश लांडगे यांचे म्हणणे येताच ते देण्यात येईल.

पक्षाची अशी मलिन प्रतिमा झालेली पाहून माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला फक्त त्याकडे बघत राहणे शक्य होत नाही. मी पक्षात राहूनही अनेकदा आमदार लांडगे यांच्या माध्यमातून होणाऱ्या भ्रष्टाचाराला कडाडून विरोध केलेला आहे. भ्रष्टाचाराच्याच उद्देशाने भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मला पक्षाविरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या सत्ताकाळात स्थायी समिती सभापतीला लाच प्रकरणात अटक झाली. ही पक्षाला नाचक्की आणणारी घटना घडली. त्यावरून भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांमध्ये किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे आता पक्षात माझा राजकीय श्वास गुदमरतो आहे, असे रवी लांडगेंनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

Mahesh Landage, Ravi Landage
असा असणार पंतप्रधानांचा ताफा; दिल्लीहून डझनभर गाड्या पुण्यात दाखल

माझे वडील दिवंगत बाबासाहेब लांडगे व चुलते दिवंगत अंकुशराव लांडगे यांच्याकडून प्रेरणा घेऊन लहानपणापासूनच भाजपात काम करायला सुरूवात केली. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप रूजवण्यासाठी माझे वडिल आणि चुलते या दोघांनीही फार कष्ट घेतले. ते मी लहानपणी जवळून पाहिले, अनुभवले आहे. तेव्हापासूनच माझ्यावर भाजपचे संस्कार रुजले. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा राजकीय जन्म हा भाजपमधूनच झालेला आहे. मी पक्षात सक्रिय झाल्यापासून पूर्ण समर्पणाने काम केले. पक्षाशी कधी गद्दारी केली नाही. भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम केले. पक्षाच्या जुन्या निष्ठावंतांना ताकद देण्याबरोबरच नवीन कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले. पक्षहित लक्षात घेऊन नवीन आणि जुना असा कधीच भेदभाव केला नाही. मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भोसरीतील धावडेवस्ती प्रभागातून बिनविरोध निवडून आलो. या पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष केला.

यापुढेही करत राहणार आहे. पण लोकांना न्याय देत असताना पक्ष म्हणून खंबीरपणे साथीची गरज असते, तीच मिळत नसेल तर पक्षात राहून उपयोग नाही. महापालिकेच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रत्येक विकासकामांत भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचारच झालेला आहे. प्रत्येक कामांत रिंग करून पक्षविरोधी काम करणाऱ्यांना बळ दिले गेले आहे. चिखलीतील संतपीठ असो की नदी सुधार प्रकल्प असो की भोसरी उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रकल्प असो की कचरा डेपोवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प असो एकही काम असे नाही. की जे भ्रष्टाचाराविना राबवण्यात आले आहे. उलट, भ्रष्टाचाराला विरोध करणारे भोसरी विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची कटकारस्थाने केली गेली.

Mahesh Landage, Ravi Landage
PM मोदींच्या केसालाही धक्का लागू न देण्याचा पुणे पोलिसांचा 'सुरक्षा प्लॅन'

माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाचे बळ कधीच मिळू दिले नाही. भाजप हा सत्ताधारी नव्हता, त्यावेळी पक्षात प्रवेश, तर लांबच साधे ढूंकूनही कोणी पाहायला तयार नव्हते. अशावेळी निष्ठावान कार्यकर्त्यांनी कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता अत्यंत कठीण काळात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. पण पक्ष जेव्हा महापालिकेत सत्ताधारी बनला त्यावेळी गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटावेत, तसे अनेकजण बाहेरून आले. आता तर पक्षाचे नेतृत्व बाहेरून आलेल्यांच्याच हातात गेले आहे. निष्ठावंतांवर लादले गेलेले हे बाहेरचे नेतृत्व स्वार्थी आहे, याचा पक्षाच्या नेत्यांना विसर पडला. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर अनेकदा गाऱ्हाणे मांडूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. पाच वर्ष सतत होणारा अन्याय सहन केल्यानंतर आणि पक्षाचे नेतेही अन्याय करणारांना पाठबळ देत असल्यामुळे मी भारतीय जनता पार्टीतील माझ्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे, असे रवी लांडगे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com